Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वेगावर मर्यादा ठेवा सातारा महाबळेश्वर रस्ता बनतोय मृत्युचा सापळा.

 वेगावर मर्यादा ठेवा सातारा महाबळेश्वर रस्ता बनतोय मृत्युचा सापळा.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज

भणंग प्रतिनिधी 

 प्रमोद पंडीत

---------------------------------

   महाड=महाबळेश्वर-मेढा-

सातारा-विटा रस्ता रूंद आणि चकचकीत झाला खरा.... पण......

  वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण न ठेवल्याने हा रस्ता ठरतो आहे मृत्युचा सापळा.

   विकासाच्या वाटेवर वेगवान प्रगती होत असताना, बेभान व बेधुंद होवून बेदरकारपणे गाडी चालवणार असाल तर हिच प्रगतीची वाट अधोगतीकडे जावून विनाशकारी ठरणार आहे.

गेल्या दोन वर्षात महाबळेश्वर - सातारा रस्त्यावर झालेल्या अपघातांची संख्या व मृत्युदर पहाता अपवाद वगळता वहानांचा अतीवेगच कारणीभूत ठरत आहे.

    २८ जुन चा शुक्रवार जावळीकरांसाठी घातवार ठरला असून आंबेघर नजिक सकाळीच अपघात झाल्याची बातमी आली. भविष्याची स्वप्ने पहाणारा वरोशीचा प्रविण कासुर्डे हा युवक जागीच ठार झाला.तर १२वीत शिकणारा संतोष कदम गंभीर जखमी झाला आहे.

   याचदिवशी एक दुसरा अपघात रात्री ९ वाजताच्या दरम्यान हमदाबाज जवळ झाला.दोन दिवसापूर्वी सुट्टीवर आलेले केंजळ ता.जावळी येथिल फौजी श्री विशाल दत्तात्रय केंजळे हे कोंडव्यावरून केंजळच्या दिशेने ज्युपिटर गाडीवरून जात होते.महाबळेश्वरकडे जाणार्‍या एका चारचाकी वहानाने त्यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार ठोकर दिल्याने ते या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सातार्‍यात प्राथमिक उपचार करून मेंदूला जबर मार लागला असल्याने पुणे येथिल मिलिटरी हाॅस्पिटलला हलविण्यात आले.उपचारा दरम्यान काल रात्री त्यांचीही प्राणज्योत मालविली आहे.

  एकाच दिवशी झालेल्या या दोन्ही अपघातांनी या पूर्वी झालेल्या अपघातांच्या जखमा ओल्या झाल्या आहेत. या ओल्या झालेल्या जखमांवर फुंकर घालून गेलेली माणस परत येणार नाहीत.

या अपघातांची शृंखला थांबविण्यासाठी प्रत्येकाने अंतर्मुख होवून विचार करायला हवा.वहातुकीचे नियम पाळून वेगावर नियंत्रण ठेवले तरंचं ही प्रगतीची वाट सुकर होईल.

Post a Comment

0 Comments