भोगावती परिसरात कर्नाटकी बेंदूर पारंपारिक उत्साहात साजरा.
भोगावती परिसरात कर्नाटकी बेंदूर पारंपारिक उत्साहात साजरा.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कौलव प्रतिनिधी
संदिप कलिकते
---------------------------------
आपल्या पुराणांमध्ये निसर्गातील प्रत्येक प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास सणांची निर्मिती केली आहे.बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे.कितीही तंत्रज्ञान विकसित झाले तरी बैलाशिवाय शेती होऊ शकत नाही.म्हणूनच बैलांच्या प्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो.
सकाळी बैलांना आंघोळ घालून, शिंगांना रंग रंगोटी करून अंगावर झुल घातली जाते.याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात.त्यांची मनोभावे पूजा करून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून बैलांना खाऊ घातले जाते .अशीच परंपरा कौलव ता राधानगरी येथे हजारो वर्षे जपली असुन ज्यांच्या कडे मानाची पाटीलकी आहे त्यांच्या घरातील बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढून मानाची कर तोडली जाते चालुवर्षी हीच मानाची पाटीलकी बाळासो शामराव पाटील (पोलिस),दिलीप शामराव पाटील (पोलिस) आणि गणपती गोपाळ पाटील यांच्या कडे असुन, त्यांच्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढून मानाची कर तोडण्यात आली.हा कर तोडणीचा कार्यक्रम बघण्यासाठी कौलव आणि परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती
Comments
Post a Comment