Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अष्टविनायक नगर मधील महिलांनी योग दिनानिमित्त केला योगाभ्यास.

 अष्टविनायक नगर मधील महिलांनी योग दिनानिमित्त केला योगाभ्यास.

---------------------------------------

रिसोड/प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकूर

---------------------------------------

शहरातील शिवाजी वसाहत परिससरातील अष्टविनायक नगर येथील महिलांनी स्वयंस्फूर्तीने 21 जून शुक्रवारी सकाळी 5:30 वाजता एकत्रित येत आंतरराष्ट्रीय योगदिन योगाभ्यास करुन साजरा केला.

 अष्टविनायक गणेश मंदिर परिसरात योग शिक्षिका हेमलता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  महिलांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक केले.योग प्राणायाम ही भारतीय संस्कृतीतील मोठी बहुमूल्य देणं आहे.भारताने विश्वाला योगाच्या माध्यमातून निरोगी 

 राहण्याचा मंत्र दिला. नियमित योग प्राणायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वस्थ सांभाळता येणं सहज शक्य असल्यामुळे योग दिनाचे औचित्य साधून अष्टविनायक नगर मधील महिलांनी योग दिन साजरा करित इतरांनी नियमित योग प्राणायाम करण्याचा संदेश दिला. या प्रेरणादायी उपक्रमामध्ये योग शिक्षिका हेमलता जाधव सह वंदना जाधव, रेखा अंभोरे,  अनुराधा देशमुख, अनुराधा खिल्लारी,नंदा गिरी,सिमला गवळी, दुर्गा भिसडे, मंगल नागरे, हिरकणी मोरे, सुवर्णा शिंदे इत्यादी महिलांनी योगाभ्यास करुन योग दिन साजरा करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

Post a Comment

0 Comments