शहरात पुन्हा प्लास्टीक बॅगचा सर्रास वापर; संबंधितांचे दुर्लक्ष.
शहरात पुन्हा प्लास्टीक बॅगचा सर्रास वापर; संबंधितांचे दुर्लक्ष.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-----------------------------------
रिसोड शासनाने कॅरीबॅगच्या वापरावर बंदी घातली असून त्यात काही विशिष्ट जाडीच्या कॅरीबॅगचा वापर करावा असे निर्देश दिले आहेत. मात्र, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा शहरात सर्रास वापर सुरू आहे. यासंदर्भात कुठलीही उपाययोजना न.प. प्रशासन करतांना दिसून येत नाही.
प्लॉस्टीक कॅरिबॅग हा
अविघटकशिल घटक असल्यामुळे पर्यावरणासाठी घातक आहे. त्यामुळे पर्यावरणाचा हास होत आहे. शहरात किरकोळ विक्रेते सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर करताना दिसून येत आहे; परंतु बंदी असतानाही या कॅरीबॅग येतात कुठून हा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्र शासनाने ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगवर बंदी घातली आहे. शहरात प्रतिबंधीत कॅरीबॅगचा वापर १०० टक्के बंद व्हावा, याकरिता न. प. प्रशासन कोणत्याही प्रकारचे प्रयत्न व.
विशीष्ट जाडीच्या कॅरीबॅगचा वापर करण्याचे आहेत निर्देश.
कारवाई करताना दिसत नाही. व्यावसायिक व्यापारी, किराणा दुकान, कापड केंद्र, लहान व्यावसायिक, मच्छी मटन विक्रेते व्यक्ती प्रतिबंधीत कॅरीबॅगचा राजरोसपणे वापर करीत आहेत; परंतु या कॅरीबॅग वापराकडे संबंधितांनी डोळेझाक केलेली आहे. शासनाने बंदी केलेल्या कॅरीबॅग येतात कोठून व त्या व्यापाऱ्याकडे कशा पोहचतात. हा संशोधनाचा विषय ठरत आहे. शहरातील संकलीत कचऱ्यामध्ये. कॅरीबॅगचे प्रमाण जास्त असून ओला व कोरडा कचरा वेगळा केला जात नाही.. विघटनशिल कचरा कॅरीबॅगमध्ये टाकून रस्त्यावर फेकल्यामुळे सदर कचरा कुजतो व त्यामधून दुर्गंधी सुटते. संकलीत कॅरीबॅग कोठेही पडून राहत असल्याने जनावरे दगावतात व त्याचा पर्यावरणावर दुष्परिणामही होतो
Comments
Post a Comment