Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा मतमोजणीसाठी कोल्हापूर पोलीस दलातर्फे चोख नियोजन !

 लोकसभा मतमोजणीसाठी कोल्हापूर पोलीस दलातर्फे चोख नियोजन !

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा  प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------------

लोकसभा निवडणुक मतदार प्रक्रिया पुर्ण झालेली असुन, दिनांक ०४/०६/२०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही नविन प्रशासकीय इमारत शासकीय गोदाम, राजाराम तलाव येथे होणार असुन, कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही रमणमळा शासकीय गोदाम या ठिकाणी होणार आहे. सदर मतमोजणी प्रक्रियेदरम्यान व मतमोजणी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडु नये, या करीता कोल्हापूर पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केलेले आहे.


, कोल्हापूर जिल्हयामध्ये मतमोजणी प्रक्रिया बंदोबस्ता करीता ०२ अपर पोलीस अधीक्षक, ०७ पोलीस उप अधीक्षक, २६ पोलीस निरीक्षक ९१ सहा पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक, ८१५ पोलीस अमंलदार, १५०० होमगार्ड, ३५ स्ट्रायकींग फोर्स, ०३ क्युआरटी पथक, ०२ एसआरपीएफ प्लाटुन, ०२ सीआरपीएफ प्लाटुन तसेच कोल्हापूर जिल्हयामध्ये ६३ संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट नेमण्यात आलेले आहेत असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.


लोकसभा निवडणुक आदर्श आचार संहिता अंमलात आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान व निकाल जाहीर झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करीता विजयी उमेदवार अथवा त्यांचे समर्थक यांनी मिरवणुक काढु नये त्याचप्रमाणे हुल्लडबाजी अथवा गाडयांच्या पुंगळ्या काढुन गोगांट करण्या-यांचेवर कडक कारवाई करणे बाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.


सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-यांचेवर सायबर पोलीसांची करडी नरज राहणार असुन, आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-यावर कडक कारवाई करणेत येणार आहे. कोल्हापूर पोलीस दलाचे वतीने नागरिकांना शांततेचे आवाहन केलेले आहे.

Post a Comment

0 Comments