जिल्हाप्रमुखांनी उचलले बंडाचे पाऊल, मुंबईच्या मातोश्री समोर होणार शक्तिप्रदर्शन?
जिल्हाप्रमुखांनी उचलले बंडाचे पाऊल, मुंबईच्या मातोश्री समोर होणार शक्तिप्रदर्शन?
---------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि
मंगेश तिखट
----------------------------------
जिल्ह्यात अगोदरच शिवसेना उबाठा मध्ये पदाच्या बाबतीत मोठी रस्सीखेच असतानाचं आता जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात पक्षप्रमुखांनी दोन जिल्हा प्रमुख असताना उपजिल्हा प्रमुख असलेले रवींद्र शिंदे यांच्या रूपाने तिसरा जिल्हा प्रमुख देऊन विद्यमान जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे व संदीप गिऱ्हे यांचे कार्यक्षेत्र बदलल्याने शिवसेना उबाठामध्ये मोठा राजकीय भूकंप आला असल्याचे बोलल्या जात आहे, दरम्यान पक्ष प्रमुखांच्या या निर्णयाविरोधात मातोश्री समोर दोन्ही जिल्हा प्रमुखांसह जिल्ह्यातील जवळपास दोनसे नाराज शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
शिवसेना उबाठामध्ये विधानसभा निहाय विचार केला तर संदीप गिऱ्हे यांच्याकडे चंद्रपूर बल्लारपूर व राजुरा हें विधानसभा क्षेत्र होते तर मुकेश जीवतोडे यांच्याकडे वरोरा चिमूर आणि ब्रम्हपुरी हें विधानसभा क्षेत्र होते, मात्र मुकेश जीवतोडे यांना वरोरा विधानसभा निवडणूक लढायची आहे आणि तशी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली असतांना त्यांनाच वरोरा विधानसभा क्षेत्रातून बाहेर केल्याने त्यांच्यासह त्यांच्या समर्थक शिवसैनिकामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, शिवाय संदीप गिऱ्हे यांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्र सोडावे लागतं असल्याने त्याच्यासाह त्यांचे समर्थक शिवसैनिक कामालीचे नाराज आहे, पक्षांच काम करत असतांना अनेक पोलीस केसेस अंगावर घेणाऱ्या खऱ्या शिवसैनिकांना डावलून बाहेरून आलेल्यांना गोंजाळले जात असल्याची भावना जुन्या शिवसैनिकांनी बोलून दाखवल्याने आता आरपारच्या लढाईत कोण कुणाला चितपट करणार हें येणाऱ्या काळात दिसेलच, पण रवींद्र शिंदे यांनी खेळलेली जोरदार राजकीय खेळी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे
ज्यांना जिल्हा प्रमुख पद त्याला उमेदवारी नाही?
शिवसेना उबाठामध्ये जों कुणी जिल्हाप्रमुख असेल त्याला उमेदवारी दिली जाणारं नाही कारण ते संघटनेच पद आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती मात्र आता उबाठा गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुखांच निवडणूक लढण्याचं तंत्र हेच जिल्ह्यातील राजकीय भूकंप आणणारं ठरत असल्याने खरंच उबाठा शिवसेनेत एकसूत्र चाललंय का? हा प्रश्न निर्माण होत असून शिवसेना उबाठा संपर्कप्रमुख प्रशांत कदम व विदर्भाचे संपर्क नेते भास्कर जाधव यांना माहिती न करता परस्पर रवींद्र शिंदे यांना जिल्हा प्रमुख पद का देण्यात आलं आणि त्यातही दोन जिल्हा प्रमुखांचे स्वतःचे वास्तव असणाऱ्या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व बदल का करण्यात आले हें प्रश्न घेऊन मुंबईच्या मातोश्री समोर शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन होणार असल्याची माहिती आहे.
Comments
Post a Comment