येवता येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न.

 येवता येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न.

--------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजित ठाकूर 

--------------------------------------------

.येवता येथे एच.एच.सी.व एस.एस.सी.परिक्षा मार्च २०२४ मध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा महंत शांतीपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तथा मा.ॲड.किरणरावजी सरनाईक, शिक्षक आमदार अमरावती तथा अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशीम यांचे मार्गदर्शनात संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरुवात महापुरषांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली.यानंतर कार्यक्रमच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य ढेंगळे सर यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उत्कृष्ट निकाल लागल्याबद्दल विद्यार्थांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले .यानंतर अॅड.शिक्षक आमदार किरणरावजी सरनाईक साहेब यांनी उत्कृष्ट निकाल देणार्‍या विद्यार्थांचा गुणगौरव केला व जिवनात अभ्यासाचे महत्व समजावुन सांगितले.अध्यक्षीय भाषणात महंत शांतीपुरी महाराज यांनी सुध्दा विद्यार्थांना भावी आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काठोळे सर यांनी तर आभार प्रदर्शन रोही सर यांनी केले.कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक,विद्यार्थी, शाळेतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांची उपस्थि. रिसोड प्रतिनिधी रणजीत सिंग ठाकूर

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.