भुये ता करवीर येथे यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीरच्या वतीने वृक्षारोपण.

 भुये ता करवीर येथे यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीरच्या वतीने वृक्षारोपण.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कौलव प्रतिनिधी 

संदीप कलिकते

-------------------------------

     वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे हे तुकाराम महाराजांच्या अभंगातील बोल आहेत, परमेश्वराने निर्माण केलेल्या माणसाने निसर्गावर घाला घातला आहे.वारेमाप वृक्षतोड केले मुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे दुष्काळ खूप वाढला असून,पृथ्वीचे तापमान वाढले आहे.म्हणुन वृक्षारोपण काळाची गरज आहे.यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चैतन्य संस्था राजगुरुनगर पुणे प्रेरित यशस्वी ग्रामीण महिला संघाच्या वतीने भुये ता करवीर येथे विविध रोपांचे वृक्षारोपण करून हा उपक्रम यशस्वी केला.वृक्षारोपणामध्ये आंबा, काजू फणस,नारळ,चिंच,जांबळ आदि रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

       संघाच्या वतीने महिलांचे विविध उपक्रम राबविले जातात.विविध दिनाचे औचित्य साधून वेग वेगळे उपक्रम राबविले जातात.या कार्यक्रमास एरिया व्यवस्थापक नुतन कांबळे,संघ व्यवस्थापिका सुजाता कलिकते, संघाच्या अध्यक्षा वंदना पाटील, पदाधिकारी विमल डोंगळे, वैशाली घुणके, वैष्णवी मिरजकर, सुषमा पाटील, सुषमा पोवार, नयना कांबळे, सविता शिवशरण,रोशन काटे,सुमन रणशिंग आदिसह कार्यकर्ते मनिषा शिंगाडे, शितल कुसाळे, वैशाली कांबळे उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.