Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शालेय विद्यार्थ्यांसह शेतकरी नागरिकांना तहसील कार्यालयात त्रास होता कामा नये:-तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर.

शालेय विद्यार्थ्यांसह शेतकरी नागरिकांना तहसील कार्यालयात त्रास होता कामा नये:-तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत सिंह  ठाकुर 

-----------------------------------


. रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर ह्या विधायक कामासाठी सरसवल्याा असून त्यांनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी हितासाठी व शालेय विद्यार्थ्यांच्या सोईसाठी रिसोड तहसील कार्यालयात विशेष पथक तयार केले असून त्या माध्यमातून सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय कामकाजासाठी त्या तत्पर असून त्या दिशेने त्यांचे विधायक कामे सुरू आहेत.यापूर्वी अन्नपुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना व इतर विभागातील कामकाजासाठी सर्वसामान्य जनतेला तहसील कार्यालयाला वारंवार चकरा माराव्या लागत होत्या त्यामुळे त्यांना आर्थिक झळ तर सोसावीच लागत होती परंतु त्यांचा वेळ वाया जात होता.रिसोड तहसील कार्यालयातील कोणत्याही विभागात काम करताना सर्वसामान्य जनता शेतकरी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच नुकताच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लागला असून पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला,जातीचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्राची गरज असल्याने त्यांना रिसोड तहसील कार्यालयात शालेय कामकाजासाठी प्रमाणपत्र काढताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी रिसोड तहसील कार्यालयातील  अधिकाऱ्यासह कर्मचारी यांची दर आठवड्याला आढावा बैठक घेऊन सर्वसामान्य जनतेस नागरिकांची कामे करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तसेच सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व त्यांची शासकीय कामे ही वेळेतच करून देण्यात यावी याबद्दल रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या असून त्या सूचनाचे तंतोतंतन पालन झालेच पाहिजेत असे आढावा बैठकीत त्यांनी ठणकावून सांगितले.रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सर्वसामान्य जनतेसह शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढाकार घेतल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments