Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बोरपाडळे येथे डंपरच्या धडकेत दुचाकीवरील पती पत्नी ठार.

 बोरपाडळे येथे डंपरच्या धडकेत दुचाकीवरील पती पत्नी ठार.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

बोरपाडळे प्रतिनिधी 

------------------------------------

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बोरपाडळे ( ता.पन्हाळा) हॉटेल चौकात भरधाव डंपरने दुचाकीस्वारास धडक देऊन अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी दोघे डंपरखाली चिरडून जागीच ठार झाले, हा अपघात सकाळी आकराच्या सुमारास झाला.मारूती रामचंद्र महाजन (वय ५७) व सुगंधा मारूती महाजन (वय ५०) (मूळ गाव जाधववाडी ता.शाहूवाडी) अशी मयत पती पत्नीचे नावे आहेत या जबर धडकेत रस्त्याकडेला असणारा विद्युत खांब तोडून विद्युत तारांच्या गुंत्यात दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पाडले होते. 


घटनास्थळी मिळालेली माहिती अशी नागपूर रत्नागिरी  महामार्गाच्या कामासाठी बोरपाडळे-कोडोली दिशेने माती भरावं वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरवरील चालकाचा ताबा सुटल्याने बोरपाडळे हॉटेल चौकात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीसह महाजन पती पत्नीस जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की भरधाव डंपरने या दोघांना चिरडत विद्युतखांब तोडत दुचाकीस सुमारे पन्नास फूट फरफटत नेली आणि समोर थांबलेल्या चारचाकीला धडक दिली.

यात दुचाकीवरील महाजन पती-पत्नीचा चिरडून जागीच मृत्यू झाला.विद्युत खांब मोडल्याने विद्युत तारांच्या गुंत्यात दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पाडले होते.तसेच यात दुचाकी व चार चाकीचे मोठे नुकसान झाले आहे. 

महाजन दाम्पत्य मूळचे जाधववाडी (ता.शाहूवाडी) येथील इचलकरंजीत कामानिमित्त येथे स्थायिक होते. आठवड्या भरात शेती पेरनीची काम आटोपून सकाळी ते इचलकरंजीस जात असताना बोरपाडळे हॉटेल फाटा येथे काही काळ थांबले आणि त्यांच्यावर या अपघातात मृत्यूरूपी काळाने घाला घातला.

मुख्य चौकात अपघातमुळे विद्युत खांब मोडून तारा तुटल्याने सर्वांची भीतीने धांदल उडाली. महावितरण कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद करून घटनास्थळी धाव घेतली. कोडोली पोलीस वं महामार्ग पोलीस पथकातील सूर्यकांत कुंभार,दीपक पाटील,अमोल निकम  घटनास्थळी दाखल होत बघ्यांची गर्दी हटवली आणि वाहतूक सुरळीत केली पोलीस पंचनाम्यानंतर महावितरणचे कर्मचाऱ्यांनी विदयुत तारा तोडून अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यास आले.संजीवन मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले 

सदर चौक नेहमी प्रवाश्यानी गजबजलेला असतो. वारणा कोडोली कडे जाण्यासाठी सकाळी मोठी गर्दी असते या ठिकाणी प्रवासी वाहतूक तसेच बस थांबा आहे. सुदैवाने दररोजच्या तुलनेत आज लोकांची वरदळ कमी होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अपघाताची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई घटनास्थळी दाखल झाल्या अपघातानंतर पळून गेलेला डंपरचालकाचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे . या घटनेचे नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.


फोटो ओळ: बोरपाडळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बोरपाडळे हॉटेल चौकात भरधव डंपरने दुचाकी वं चारचाकीस धडक देऊन झालेला अपघात. यामध्ये चिरडून जागीत ठार झालेले पती मारूती महाजन वं पत्नी सुगंधा महाजन

Post a Comment

0 Comments