सातारा लोकसभा निकालानंतरच्या निवडणूक रॅलीमध्ये घडलेले सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघड... स्कॉर्पिओ जीप असा एकूण २७,७८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
सातारा लोकसभा निकालानंतरच्या निवडणूक रॅलीमध्ये घडलेले सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघड... स्कॉर्पिओ जीप असा एकूण २७,७८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
---‐---------------------------------------------
दि.०४/०६/२०२४ रोजी दुपारी ३.५७ वा. चे. सुमारास ४५ लोकसभा मतदार संघाचे विजयी उमेदवार मा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या रॅली मध्ये अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या गळयातील ३.५० तोळे वजनाची चेन चोरुन नेली तसेच आणखी ५ इसमाच्या सोन्याच्या चेन कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करुन नेल्या म्हणून दिले मजकुराचे फिर्यादीवरुन सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं.५०५/२०२४ भादविस का ३७९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने तपास घेवून नमुद अज्ञात सोनसाखळी चोरांची माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिगाडे यांचे अधिपत्याखाली तपास पथक तयार करुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. तपास पथकांनी सर्वप्रथम तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अज्ञात आरोपींची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु केला.
दि.१४/०६/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे गोपनीय विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी बाबासाहेच महादेव गायकवाड रा. येळी ता. पाथर्डीं जि. अहमदनगर व त्याचे इतर ५ साथिदार यांनी दि.०४/०६/२०२४ रोजी मा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या विजयी रैलीमध्ये लोकांच्या गळयातील सोन्याच्या चेन चोरी केल्या असून ते सर्वजण सातारा बस स्थानक परिसरात वावरत आहेत, त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व त्यांचे पथकास बोलावून घेवून त्यांना नमुद आरोपींना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकाने सातारा बस स्थानक परिसरामध्ये सापळा लावून १) बाबासाहेब महादेव गायकवाड रा. येळी ता. पाथर्डी जि. अहमदनगर, २) रामदास सोमनाथ घुले रा. माळेगाव चकला ता. शिरुर जि.बीड, ३) सचिन काळू पवार रा. आनंदनगर ता. पाथर्डी जि. अहमदनगर, ४) नितीन शिवाजी धोत्रे रा. नाथनगर ता. पाथर्डी जि. अहमदनगर, ५) अर्जुन लक्ष्मण मासाळकर रा. वाळूंज ता. पाथर्डी जि. अहमदनगर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे नमुद गुन्ह्यांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा तसेच सातारा व फलटण शहरात देखील आणखी ३ गुन्हे केल्याचे सांगीतले असून नमुद गुन्हयात चोरीस गेलेले चालू बाजारभावा प्रमाणे २०,६६,०००/- रुपये किमतीचे २८.७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे, १२,०००/- रुपये रोख रक्कम, तसेच गुन्हा करताना वापरलेली ७,००,०००/- रुपये किंमतीची महिंद्रा स्कॉर्पिओ क्रमांक एम.एच.४८ ए.सी.००२१ असा एकूण २७,७८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी असे एकूण २८९ गुन्हे उघड करुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी चालू बाजार भावाप्रमाणे ४,६५,८६,९००/- रुपये किमतीचे (६ किलो ६६२ ग्रॅम वजनाचे) सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आलेले आहेत.
समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, अजित कणे, अमित सपकाळ, मनोज जाधव, राजू कांबळे, अमित माने, शिवाजी भिसे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, अजय जाधव, अमित झेंडे, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, शिवाजी गुरय, अमृत कर्षे, विजय निकम, दलजित जगदाळे यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.
Comments
Post a Comment