Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संघटनात्मक पक्ष बांधणीवर भर द्या - दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख मंगेश साळवी. तालुका संपर्कप्रमुखांनी घेतला दक्षिण ग्रामीणचा आढावा.

 संघटनात्मक पक्ष बांधणीवर भर द्या - दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख मंगेश साळवी. तालुका संपर्कप्रमुखांनी घेतला दक्षिण ग्रामीणचा आढावा.

------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार

------------------------------------

दक्षिण विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख मंगेश साळवी यांनी उंचगाव जिल्हा परिषद,गडमुडशिंगी ,पाचगाव, उजळईवाडी व निगवे खालसा या सर्व जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांची मिटिंग घेऊन मतदार संघातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी कशी असावी याविषयी सविस्तर माहिती घेऊन मार्गदर्शन केले तसेच शाखाप्रमुख व पदाधिकारी बिएलओ व पोलिंग एजंट यांना मार्गदर्शन केले येणारा विधानसभा निवडणुकीवर विशेष लक्ष मातोश्री वरून देण्यात आले आहे कार्यकर्त्यांनी आतापासूनच मतदारसंघातील घरा घरात मशालचिन्ह पोहोचून मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी कोरोना काळात जे काम केले त्याची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोचवण्याचे काम शिवसैनिक व पदाधिकारी यांचे आहे याबाबत वरिष्ठ पदाधिकारी केव्हाही मतदारसंघात येऊन कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत तरी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे असे आव्हान मंगेश साळवी यांनी केले. 

यावेळी उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे, पोपट दांगट , करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विनोद खोत,विराज पाटील व दीपक रेडेकर ,दीपक पाटील, राहुल गिरूले, विराग करी, अरविंद शिंदे ,विक्रम चौगुले, शरद माळी,सुनील चौगुले, योगेश लोहार, अमर जाधव, संदीप दळवी, सचिन नागटिळक, अजित पाटील , बंडा पाटील, दीपक फ्रेमवाला, दीपक अंकल, अजित रोटे, वसंत पवार,नमेश चव्हाण , दत्ता फराकटे , शिवाजी लोहार, आनंदा नाईक, सुनील परपाणी ,किशोर कामरा, बाळासो नलवडे, नितीन निकम आदि दक्षिण ग्रामीण मधील सर्व उपतालुकाप्रमुख शाखाप्रमुख ,विभागप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments