छत्रपती शिवाजी महाराज विटंबना प्रकरणी तावडे हॉटेल ,परिसरात शिवप्रेमींकडून चक्काजाम.
छत्रपती शिवाजी महाराज विटंबना प्रकरणी तावडे हॉटेल ,परिसरात शिवप्रेमींकडून चक्काजाम.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------
पुणे हडपसर ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर १२ जून या दिवशी सायंकाळी ७ वाजता एका समाजकंटकाने दगड भिरकावला. त्यामुळे सर्व शिवभक्त, तसेच हिंदू यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो शिवप्रेमींनी
,तावडे हॉटेल परिसरात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
महापुरुषांची विटंबना करणार्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी,
पाकिस्तान मुर्दाबाद, जय श्री श्रीराम , भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजी करत.रास्ता रोको करण्यात आला.
काही वाहनधारक आपले वाहन,बाजूने काढत जात असताना.आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत nh4 कडे पळत जात असताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
आणि या कृत्याच्या मागे आणखी कोण आहे ?, याचे सखोल अन्वेषण करावे, अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.
कोणताही अनुसूचित प्रकार घडूनये यासाठी शाहूपुरी पोलीस ठाणे , गांधीनगर पोलीस ठाणे, शिरोली पोलीस ठाणे, व महामार्ग पोलीस तैनात होते.
यावेळीअनेक पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवप्रेमी हिंदुत्ववादी संघटनेचे समर्थक
उपस्थित होते.
Comments
Post a Comment