लक्ष्मीपूरीतील एकल प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांना 1 लाख 10 हजार दंड.
लक्ष्मीपूरीतील एकल प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांना 1 लाख 10 हजार दंड.
---------------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------------
कोल्हापूर ता.25 : लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार येथील सहा स्क्रॅप मटेरियल विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडे सिंगल युज प्लास्टिकचा साठा आढळलेने त्यांना 1 लाख 10 हजार दंडाची नोटीस बजाविण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमावली 2016 अंतर्गत संबंधित सहा दुकानदारांना नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचेल अशा पद्धतीने घनकचरा जमा केल्याबाबत 1 लाख रुपये दंड आणि एकल युज प्लॉस्टिक बंदी अंतर्गत रुपये 10 हजार अशी दंडाची कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी या व्यापा-यांनी बॉटल, प्लास्टिक पिशव्या, रबर्स इत्यादी कोणत्याही रिसायकलिंग शिवाय पुनर विक्रीसाठी दुकानात आणि दुकानाच्या बाहेर संकलित, साठवणूक केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी तपासणी दरम्यान केली आहे. यापैकी एक व्यापारी यासीन स्क्रॅप मर्चंट यांनी एकल युज प्लास्टिक बंदी बाबतची दंडाची रक्कम रुपये 10 हजार आज आरोग्य विभागाकडे भरणा केलेली आहे. तर घनकचरा व्यवस्थापन नियमावली 2016 अंतर्गत बजावलेल्या 1 लाख दंडाची वसुली अद्याप प्रलंबित आहे. उर्वरीत पाच दुकानदारांना दंडाची रक्कम भरण्यास सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment