जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन.

 जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन.

-----------------------------------

कोल्हापूर, प्रतिनिधी

-----------------------------------

सप्ताहाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन.

: दरवर्षी दिनांक 1 ऑगस्ट हा 'महसूल दिन' म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2024 या महसूल सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून महसूल सप्ताहाचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.


  महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्यावेळी पुर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आणि महसुली वसुलीचे उदिष्ट पार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या काम‌काजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता शासनाच्या दि.19 जुलै 2002 रोजीचे परिपत्रक व दि.3 सप्टेंबर 2010 च 6 सप्टेंबर 2011 च्या शासन निर्णयानुसार दरवर्षी दिनांक 1 ऑगस्ट हा 'महसूल दिन' म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. महसूल सप्ताहामध्ये, प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहिम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे, महसूल अदालत यांचे आयोजन करण्याच्या सूचना या परिपत्रकाव्दारे देण्यात आल्या आहेत.


1 ऑगस्ट - महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ" "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" - या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकार सेवा केंद्र, ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र, तहसिल कार्यालये येथे उपस्थित राहणा-या महिला अर्जदारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना सौजन्याची वागणूक देण्याबाबत आणि त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.या योजनेच्या लाभापासून एकही पात्र वंचित राहणार नाही, याबाबत विशेष दक्षता घ्यावी.


2 ऑगस्ट- "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना"- राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासन निर्णय, कौशल्य, रोजगार, उद्योगकता व नाविन्यता विभाग, दिनांक 09 जुलै 2024 अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

योजनेचा लाभ अधिकाधिक युवकांना प्राप्त व्हावा, त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड इ. आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात यावे.


3 ऑगस्ट - "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना"- या योजनेचा लाभ अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त व्हावा यासाठी विशेष कक्ष स्थापन करुन अर्ज भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात यावे. सेतू केंद्र, तहसिल कार्यालये येथे उपस्थित राहणा-या ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना सौजन्याची वागणूक देण्याबाबत आणि त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य करावे.

 मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबत जिल्हा तालुका स्तरावर व्यापक प्रसिध्दी देऊन जनजागृती करावी. या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने संबंधित विभागांसोबत समन्वय साधुन योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी उपाययोजना कराव्यात. या योजनेकरीता आवश्यक असलेले उत्पन्नाचे दाखले, शासनामार्फत ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे संबंधित लाभार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावी.


4 ऑगस्ट - स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय- विशेष मोहिम राबवून जिल्हास्तरावरील, तालुकास्तरावरील, मंडळ स्तरावरील व ग्रामस्तरावरील कार्यालयांची व परिसराची साफसफाई करावी. कार्यालयाचे अभिलेख व दस्ताऐवज यांचे वर्गीकरण व व्यवस्थापन, नोंदणीकरण व महत्त्वाच्या दस्ताऐवजांचे स्कॅनिग व संगणकीकरण करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. सेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित सेवा, यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, शुल्क, सक्षम प्राधिकारी इत्पादी माहिती दर्शविणारे फलक अद्यावत करावेत. 

 शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसिध्दीपत्रक स्वरुपात लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावी.


5 ऑगस्ट - "सैनिक हो तुमच्यासाठी"- राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुंटुंबियांना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले प्रमाणपत्रे मिळण्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करावी. 

  संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचा-यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करावी. तसेच, संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरासाठी, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून संरक्षण दलातील कर्मचा-यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत.


6 ऑगस्ट- “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा" - राज्यातील दिव्यांग व्यक्तींकरीता शासनाच्यावतीने राबविण्यात येणा-या विविध योजना, उपक्रम,शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले, प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्यावेत. विविध योजनांतर्गत देण्यात येणा-या लाभांच्या अनुषंगाने जिल्हा, तालुका स्तरावर शिबीर आयोजित करुन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपकरणांचे वाटप करावे. अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व कोणत्याही शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित अनाथाश्रमात न राहणारे मुले-मुली यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने अनाथ असल्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने विशेष मोहिम राबवावी. या अनाथ मुलांना अनुज्ञेय लाभ देण्यासाठी या क्षेत्रात काम करणा-या सामाजिक संस्थांची मदत घ्यावी.


7 ऑगस्ट - "महसुल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी व महसुल सप्ताह सांगता समारंभ"-विभागनिहाय उत्कृष्ट काम करणा-या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचा उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी म्हणून गौरव सन्मान करण्यात येणार आहे. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 


या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना महसूल विभागाच्या परिपत्रकाव्दारे देण्यात आल्या असून महसूल यंत्रणेमार्फत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबतची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेण्यासाठी महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.