संत गोरा कुंभार हौसिंग सोसायटी हॉलमध्ये 21 नागरीकांचे स्थलांतर.

 संत गोरा कुंभार हौसिंग सोसायटी हॉलमध्ये 21 नागरीकांचे स्थलांतर.

---------------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------------

 जिल्ह्यामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदी धोका पातळीकडे जात आहे. संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्य ठेवण्यात आली असून पूर बाधीत क्षेत्रातील बापट कॅम्प परिसराती 21 नागरीकांचे स्थलांतर बापट कॅम्प येथील संत गोरा कुंभार हौसिंग सोसायटी हॉल येथे निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये पाच कुटुंबातील 07 पुरुष 14 महिलांचा समावेश आहे. आज अखेर महापालिकेच्या निवारा केंद्रात 75 नागरीक स्थलांतरीत झाले आहेत.


            त्याचबरोबर शहरामध्ये आज प्रतिभानगर येथे 1, पार्वती टॉकीज सकाळ प्रेस जवळ 1, मंगेशकरनगर येथे 1, महालक्ष्मी नगर येथे 1, सोमवार पेठ येथे 1, कुंभार गल्ली मेन रोड येथे 1, सीपीआर हॉस्पिटल येथे 2, महाराष्ट्र उद्यान येथे 1, मार्केट यार्ड रोड येथे 1, सदर बाजार उर्दू शाळा येथे 1, केव्हीज पार्क येथे 1 झाड, इन्कम टॅक्स भवनचे शेजारी 1 झाड, विवेकानंद कॉलेज येथे 1 झाड, कदमवाडी मेनरोड येथे 1 झाड अशी 13 झाडे पडलेली असून ती उद्यान व अग्निशमन विभागाच्यावतीने कटींग व उठाव करुन रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.


            तर विभागीय कार्यालय क्र.2 मध्ये उतरेश्वर पेठ येथील भुसार गल्लीतील एका घराची धोकादायक भिंत पडली आहे. विभागीय कार्यालय क्र.3 मध्ये दौलतनगर येथील क्रांती तरुण मंडळाजवळील गल्लीतील एका घराचे छत पडलेले आहे. त्या ठिकाणी विभागीय कार्यालयाने मदतकार्य सुरु केले आहे. त्याचबरोबर आजपासून वॉर रुमकडे नागरीकांना 0231-2542601, 2545473 या फोन नंबर बरोबरच व्हॉटसपवर मेसेजेस, फोटो टाकणेसाठी 9970711936 हा नंबर उपलब्ध करुन दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.