23 जुलै जागतिक वृक्ष-संवर्धन दिन कार्यक्रमाचे आयोजन.

 23 जुलै जागतिक वृक्ष-संवर्धन दिन कार्यक्रमाचे आयोजन.

--------------------------------------

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत सिंह ठाकुर 

--------------------------------------

 गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी विविध संघटनेच्या माध्यमातून वृक्षारोपणाने एका फार मोठ्या चळवळीचे रूप धारण केले आहे,हि बाब वंदनीय आहे.पण रोपीत केलेल्या वृक्षांच्या तुलनेत किती वृक्षांचे संवर्धन होते हा नेहमीचं कळीचा मुद्दा राहीला आहे.आपणा कडुन जेवढे वृक्ष जगविल्या जातील तेवढ्याचं मर्यादित वृक्षांचे रोपण करावे असे परखड मत "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री  पुरस्कार" प्राप्त गजानन मुलंगे ह्यांनी 23 जूलै रोजी संत सातारकर महाराज संस्थान रिसोड येथे आयोजित वृक्ष- संवर्धन दिन कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता संस्थानचे अध्यक्ष तथा रिसोडचे माजी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख,कोषाध्यक्ष रामरास वाळके, सचिव भगवानराव देशमुख, व्यवस्थापक श्रीराम नरवाडे,पुजारी अमर पाठक,पोलीस पाटील गजानन कोरडे,वनपाल विष्णु जटाळे,वनरक्षक रमेश कदम सामाजिक वनिकरण विभाग परिक्षेत्र रिसोड,मा. मुख्याध्यापक मदन चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अनुषंगाने बांबूपासून टिकाऊ वृक्षरक्षक जाळीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.सदर्हु प्रात्याक्षिकामध्ये आठ फुट उंचीचे तीन बांबू त्रिकोणाकृती आकारामध्ये दोन फुटापर्यंत जमिनीमध्ये गाडतात.एक फुट अंतरावर खालुन वरपर्यंत प्रत्येक दोन बांबुंना बांधी तारेच्या साहाय्याने बांबुच्या आडव्या पट्ट्या घट्ट बांधतात.तद्नंतर आडव्या पट्ट्यांना बांधी तारेच्या साहाय्याने ऊलट-सुलट काटेरी फांद्या बांधल्यास निसंकोच एक मजबूत व टिकाऊ वृक्षरक्षक जाळी तयार होते.मुलंगे पुढे म्हणाले कि,ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला बालपणा पासुन सुसंस्कारित केले तर तो तनमनाने सुदृढ होऊन समाजामध्ये एक सुजाण नागरिक म्हणून वावरतो त्याचप्रमाणे इवल्याश्या रोपट्याचे सुध्दा संवर्धन केल्यास त्याचे एका डौलदार वृक्षांमध्ये रूपांतर होते ह्यामध्ये तिळमात्र शंका नाही.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परसराम नरवाडे,आनंदा गरकळ,अशोक इरतकर,विनोद थोरात,भगवान पवार व विणेकरी मंडळी ईत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.