Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शेळप येथे सप्तरंगी दुर्मिळ वनस्पतीच्या 28 पोती जप्त वन्यजीव ची कारवाई.

 शेळप येथे सप्तरंगी दुर्मिळ वनस्पतीच्या 28 पोती जप्त वन्यजीव ची कारवाई.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-------------------------------------

राधानगरी तालुक्यातील दाजीपूर वन्यजीव चे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत शेळप येथे आले असता त्यांना रस्त्यालगत थांबलेला ट्रक दिसला असताना त्या ट्रक मध्ये जंगलातील दुर्मीळ सप्तरंगी वनस्पतीची 28 पोती भरलेली आढळून आल्याने ट्रक् सह दोघांना ताब्यात घेऊन अंदाजे नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती वन्यजीव खात्याकडून देण्यात आली


या अधिक माहिती अशी की दाजीपूर येथील वन्यजीव चे अधिकारी व कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना शेळप येथे रस्तालगत ट्रक नंबर एम एच झिरो सात ए जे 2518 यामध्ये दुर्मिळ सप्तरंगी वनस्पती 28 पोती 1221 किलो वजनाची भरलेले आढळून आली असून अंदाजे आठ लाख 85 हजार 470 रुपयाची सप्तरंगी वनस्पती व वाहन जप्त केले या वाहनासोबत वैभव डोके रा. कुणकेश्वर जिल्हा सिंधुदुर्ग वाहन चालक ओंकार वसंत चव्हाण रा. हसणे तालुका राधानगरी या दोघांना ताब्यात घेतले आहे अन्य पंढरी अशोक सावंत हसणे व तानाजी कांबळे, हसणे पैकी तांब्याची वाडी तालुका राधानगरी हे दोघे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाले आहेत यातील वैभव डोके ओंकार चव्हाण या दोन आरोपींना राधानगरी प्रथम नाय दंडाधिकारी त्यांच्यासमोर हजर केला असताना त्यांना एक दिवसाची वन कोठडी देण्याच्या आदेश देण्यात आले आहेत

बाबांचा अधिक तपास याबाबतचा अधिक तपास राधानगरी व दाजीपूरचे वन्यजीव चे अधिकारी व कर्मचारी करत आहेत

Post a Comment

0 Comments