राज्य उत्पादन शुल्क कणकवली, यांची कारवाई.अंदाजे 35 लाखाचा मुद्देमाल जप्त.
राज्य उत्पादन शुल्क कणकवली, यांची कारवाई.अंदाजे 35 लाखाचा मुद्देमाल जप्त.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
----------------------------
सोमवारी गोवा राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांनी कारवाई करत गोवा बनावटीच्या बिअरचा साठा जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की
काल दिनांक २२/०७/२०२४ रोजी दुपारी 2.40 च्या सुमारास वारगांव ता. कणकवली येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांनी वाहन तपासणीत केलेल्या कारवाईनुसार एक टाटा कंपनीचा चार कंपार्टमेंट, असलेला टैंकर क्रमांक GJ 12/AY 2368 मध्ये छुप्या पध्दतीने वाहतूक होत असताना गोवा बनावटीच्या बिअरचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत गोवा राज्यनिर्मित बियर चे ४५० बॉक्स जप्त करण्यात आले. मिळून आलेल्या बिअरची अंदाजे किमत रु. २२,३२,०००/- व टँकरची किंमत रु.१३,००,०००/- व इतर मुद्देमाल असा एकूण रु. ३५,३२,०००/- किंमतीचा मुदेदमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी टँकरचालक प्रभूलाल भंवर लाल, वय ३४ वर्षे, रा. दंतेडी, धुंवाला, तहसीलमांडल, जिल्हा भीलवाडा, राज्य राजस्थान ३९९ ८०४ याला ताब्यात घेवून रिमांडकामी हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे सदरची कारवाई अधीक्षक सिंधुदुर्ग मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादक शुल्क कणकवली विभागाचे निरीक्षक श्री एन एल शिंदे यांच्या मार्गदर्शनात खाली दुय्यम निरीक्षक एस डी पाटील,जे एस मानमोड, एस एस चौधरी, एस एस कुवेसकर यांनी ही कारवाई केली
Comments
Post a Comment