चारचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 5 ऑगस्टपासून सुरु.

 चारचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 5 ऑगस्टपासून सुरु.

----------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------

कोल्हापूर, दि. 30 ( प्रतिनिधी ) : चारचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GM दि. 4 ऑगस्टपर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन चारचाकी नोंदणी मालिका MH09- GU  दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 5 व 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली आहे.


लिलाव पध्दतीव्दारे वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.

      पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जा सोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचाएकच Demand Draft (धनाकर्ष) दिनांक 5 व 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेत कार्यालयात सादर करावा.  6 ऑगस्ट रोजी 5 वाजल्यानंतर पसंती क्रमांकाच्या (लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या) याद्या प्रसिद्ध केल्या जातील, लिलावातील जादा रकमेचा एकच DD स्वीकारण्यात येईल. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

        एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांकडून दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी जादा रकमेचा एकच स्वतंत्र Demand Draft (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते दुपारी 2.30 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एक पेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दिनांक 7 ऑगस्ट 2024  रोजी दुपारी 4 वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. फक्त अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांना लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल व लिलावास येताना अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्यास त्यांच्याकडे प्राधिकारपत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. आकर्षक क्रमांकाची मागणी करताना आधारला संलग्न असलेलाच मोबाईल नंबर व पत्ता अर्जावर लिहावा, अर्जावर मोबईल नंबर लिहला नसल्यास आपला कोणताही हक्क आकर्षक क्रमांकावर राहणार नाही. तसेच यादीमध्ये आपले नाव आले तरी आपल्यास आकर्षक क्रमांक मिळणार नाही.

         एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणी करुन नाही घेतली तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक अपोआप रद्द होईल व शुल्क सरकार जमा होईल. विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. नियमित रोखीने पावत्या 13 ऑगस्ट 2024 पासून सुरु करण्यात येतील. तसेच पावती झाल्याचा संदेश आपल्या भ्रमणध्वनीवर प्राप्त झाल्यावरच पावती घेण्याकरता हजर राहून पावती तपासून घ्यावी. वैयक्तिक अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फी चा धनादेश वाहनधारकाने फी ची खात्री करुनच जमा करावा. जरी नजर चुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल.  महाराष्ट्र मोटर वाहन नियम कलम 54 (A) नुसार ज्या पसंती क्रमांकाची पावतीची मुदत 30 दिवस पूर्ण झालेली असेल असा पावतीवरील आपला हक्क 30 दिवसानंतर संपुष्टात येईल. पसंती क्रमांकाच्या यादीबाबत कोणतीही त्रुटी आढळल्यास एक तासाच्या आत संपर्क साधावा, असेही श्री. चव्हाण यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.