शहरामध्ये आज 609 नागरीकांचे स्थलांतर.

 शहरामध्ये आज 609 नागरीकांचे स्थलांतर.

------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

रजनी कुंभार 

 -----------------------------

कोल्हापूर ता.27 - जिल्ह्यामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा रात्रदिवस काम करत असून पूर बाधीत क्षेत्रातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प, रमणमळा, उलपेमळा, कसबा बावड या परिसरातील 609 नागरीकांचे आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये 152 कुटुंबातील 301 पुरुष, 308 महिला व 100 मुलांचा समावेश आहे. तर आजअखर महापालिकेच्या निवारा केंद्रात 220 कुटुंबातील 443 पुरुष, 440 महिला व 148 मुले असे 883 नागरीकांचे स्थलांतर झाले आहे. या सर्व निवारा केंद्रातील स्थलांतरीत कुटुंबांना महापालिकेच्यावतीने नाष्टा, चहा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने वैद्यकीय टिम दैनंदिन तीन वेळा या मठामध्ये येऊन वैद्यकीय तपासणी करुन नागरीकांना मोफत औषधे देत आहे. तर शहरातील 154 जणावरांचे राजाराम साखर कारखाना, दसरा चौक ग्राऊंड, उतरेश्वरपेठ ग,गो,जाधव हॉल, कसबा बावडा पोल्ट्री ऑफिस या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांना चा-याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.


            तसेच पूरबाधीत क्षेत्रातील नागरीकांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील वॉर रूममध्ये 0231-2542601, 2545473 या दोन फोन नंबर्सवर मदतीसाठी व माहितीसाठी संपक्र साधावा असे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.