राधानगरी धरण भरण्यास तेरा फूट कमी असून धरण , 74.66 टक्के% भरले तर जुलै अखेर धरण खुले होणार.
राधानगरी धरण भरण्यास तेरा फूट कमी असून धरण , 74.66 टक्के% भरले तर जुलै अखेर धरण खुले होणार.
-------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------
राधानगरी धरण परिसरात मुसळधार पावसाने झोडपले असून राधानगरी धरण भरण्यास तेरा फूट कमी असून धरण 74.66% भरले तर राधानगरी धरण जुलै अखेर खुले होणार असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली
याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाटणे वाढ होत असून धरणाची पाण्याची पातळी 335.24 फुट पाणीसाठा 62 22.४० दशलक्ष घनफूट असून धरण 74.66% भरले आहे तर आज सकाळी सहा पर्यंतचा पाऊस 119 मिलिमीटर तर आज सायंकाळी चार वाजे पर्यंतचा 45 मिलिमीटर व एक जून ते 20 जुलै अखेर 22 13 मिलीमीटर झाला आहे व विद्युत गृह चौदाशे पन्नास कयुसेक्सपाणी सोडण्यात आले आहे गेल्या वर्षी 20 जुलै रोजी एकूण पाऊस 1462 मिलिमीटर झाला होता राधानगरी धरण भरण्यास 12 फूट कमी असून गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी 751 मिलिमीटर पाऊस जास्त झाला तर जुलै अखेर धरण खुले होणार असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली असून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नदीच्या पात्रामध्ये पाण्याची झपाटणे वाढ होत असल्याने, नदीकडच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान पाटबंधारे खात्याकडून करण्यात येत आहे
Comments
Post a Comment