राधानगरी धरण भरण्यास , -तीन फूट कमी असून धरण , 94 टक्के% भरले तर बुधवारी पावसाचे प्रमाणात वाढ गुरुवारी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता.
राधानगरी धरण भरण्यास , -तीन फूट कमी असून धरण , 94 टक्के% भरले तर बुधवारी पावसाचे प्रमाणात वाढ गुरुवारी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
राधानगरी धरण परिसरात आज बुधवार दिवसभर पावसाचे प्रमाणात वाढ झाल्याने राधानगरी धरण भरण्यास तीनफूट कमी असून धरण 94% भरले तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे गुरुवारपर्यंत खुले होण्याची शक्यता असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली
याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात आज बुधवार पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत धरणाची पाण्याची पातळी 344.62 फुट पाणीसाठा 7817.55 दशलक्ष घनफूट असून धरण 94% भरले आहे तर आज सकाळी सहा पर्यंतचा पाऊस 120 मिलिमीटर तर आज सायंकाळी चार वाजे पर्यंतचा 58 मिलिमीटर व एक जून ते 24जुलै अखेर 2733 मिलीमीटर झाला आहे व विद्युत गृह पंधराशे कयुसेक्सपाणी सोडण्यात आले आहे राधानगरी धरण भरण्यास तीनफूट कमी तर गुरुवार पर्यंत धरणाचे दरवाजे खुले होण्याची शक्यता असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली असून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने नदीच्या पात्रामध्ये पाण्याची झपाट्याने वाढ होत असल्याने, नदीकडच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान पाटबंधारे खात्याकडून करण्यात येत आहे
काळमवाडी धरण 70 टक्के तर तुळशी धरण 80 टक्के भरले आहे
Comments
Post a Comment