जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 10 हजार 68 क्युसेक विसर्ग.

 जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 10 हजार 68 क्युसेक विसर्ग.

 ---------------------------------------

  कोल्हापूर, प्रतिनिधी

 ---------------------------------------

 जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 1,3, 4,5,6 व 7 हे 6 दरवाजे खुले असून सध्या धरणातून 10 हजार 68 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे

 

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी व घुंगुरवाडी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे, मांडुकली व असळज, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, गवशी, गाटीवडे, पानोरे, म्हसुर्ली व शेळोशी वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे, शाळी नदीवरील- येळाणे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी, दत्तवाड व तुरुंबे, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, जरळी, हजगोळी, भादवण, गजरगाव व गिजवणे. घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी. चित्री नदीवरील परोली असे एकूण 95 बंधारे पाण्याखाली आहेत.

 

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.36 टीएमसी, तुळशी 3.13 टीएमसी, वारणा 30.52 टीएमसी, दूधगंगा 20.39 टीएमसी, कासारी 2.21 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.12 टीएमसी, पाटगाव 3.50 टीएमसी, चिकोत्रा 1.08 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

 

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 44.6 फूट, सुर्वे 42.7 फूट, रुई 71.8 फूट, इचलकरंजी 68.6 फूट, तेरवाड 62.6 फूट, शिरोळ 59.6 फूट, नृसिंहवाडी 59 फूट, राजापूर 47.10 फूट तर नजीकच्या सांगली  36.6 फूट व अंकली 39.3 फूट अशी आहे.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.