Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

"स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त.किसन वीर महाविद्यालयात केशर आंब्याच्या रोपांचे वितरण उत्साहात संपन्न ".

 "स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त.किसन वीर महाविद्यालयात केशर आंब्याच्या रोपांचे वितरण उत्साहात संपन्न ".

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी 

 कमलेश ढेकाणे 

---------------------------------------

वाई: १ जुलै, हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्या निमित्ताने साजरा होणारा महाराष्ट्राचा कृषीदिन याचे औचित्य साधून किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना ३००० आंब्यांच्या रोपांचे वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, महाविद्यालयातील तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षक बाळासाहेब कोकरे उपस्थित होते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे....या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला अनुसरून आणि मा. मदनदादा भोसले यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयाच्यावतीने केशर आंब्याची रोपे विद्यार्थ्यांना विना मोबदला उपलब्ध करून दिले असून; ०१ जुलै कृषीदिन ते १२ जुलै जनता शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन या दरम्यान किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थी आपापल्या घरासमोर, शेताच्या बांधावर या रोपांचे रोपण करणार आहेत. या अनुषंगाने पर्यावरण समतोल राखण्याची जबाबदारी किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे आपले मनोगत व्यक्त करताना, "पर्यावरण समतोल राखण्याची जबाबदारी सर्व मानव जातीवर असून अत्यंत प्रामाणिकपणाने हे कार्य केले पाहिजे म्हणून वृक्षांची लागवड होणे महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाने हे एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे."

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपस्थित सर्वांचे आभार पर्यवेक्षक बाळासाहेब कोकरे यांनी मानले. 

या कार्यक्रमाप्रंसगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments