कोनवडे उपसरपंचपदी शैलजा देसाई यांची बिनविरोध निवड.
कोनवडे उपसरपंचपदी शैलजा देसाई यांची बिनविरोध निवड.
-------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरुपा खतकर
-------------------------------------
कोनवडे ( ता . भुदरगड ) येथील उपसरपंचपदी कै .एम डी पाटील गटाच्या शैलजा रामचंद्र देसाई यांची बिनविरोध निवड झाली . निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता कांबळे होत्या .
आघाडीच्या रोटेशन प्रमाणे ठरल्यानुसार उपसरपंच विक्रम पाटील यानी राजीनामा न दिल्याने या निवडीला वेगळे स्वरूप मिळाले होते .ऐन वेळी त्यांनी भरलेला फॉर्म माघार घेतल्याने उपसरपंच निवड बिनविरोध झाली . निवडीनंतर त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला . निवडीनंतर उपसरपंच देसाई यांनी कोनवडे गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार, असल्याचे आश्वासन दिले .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील , समाधान कांबळे , गौरी पाटील , राणी चव्हाण , आश्विनी पाटील , शितल पाटील तसेच के ए पाटील , शिवाजी पाटील ,वाय बी पाटील , संदीप उर्फ पिंटु पाटील , प्रविण पाटील कृष्णात खतकर , युवराज पाटील , दयानंद सुतार , माजी सरपंच राणी पाटील , यशवंत पाटील , आबाजी कांबळे , शशिकांत पाटील , पि जी पाटील, मारूती बुडके उपस्थित होते . निवडीनंतर शैलजा देसाई यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळत, फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष केला
Comments
Post a Comment