पर्यावरण संवर्धनाचा तडशिनहाळ पॅटर्न... हरित ग्रुप, शाळा, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण.

 पर्यावरण संवर्धनाचा तडशिनहाळ पॅटर्न... हरित ग्रुप, शाळा, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण.

------------------------------------ 

चंदगड प्रतिनिधी

आशिष पाटील 

------------------------------------ 

    तडशिनहाळ (चंदगड) : निसर्ग मित्र व्हा... झाडे लावा झाडे जगवा... हा संदेश देत हरित ग्रुप तडशिनहाळ, विद्या मंदिर शाळा, शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्यामार्फत तडशिनहाळ परिसरात 500 झाडांचं वृक्षारोपण केले. 

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पर्यावरण संवर्धनाची गरज ओळखून हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. सध्या वातावरणातील बदल, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस यामुळे होणारे दुष्परिणाम पाहता, यावर्षीपासून तडशीनहाळ गावातील हरित ग्रुपतर्फे वृक्ष लागवड आणि संवर्धन असा उपक्रम हाती घेण्यात आला. त्याला ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थ्यांनी साथ देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.