मेढा परिसरात मुसळधार पाऊसाचा कहर.

 मेढा परिसरात मुसळधार पाऊसाचा कहर.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा प्रतिनिधी

सूर्यकांत जाधव 

----------------------------

सविस्तर :- जावली तालुक्याची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मेढा येथे पावसाने अक्षरशः कहर केला असून नवीन झालेल्या मेढा महाबळेश्वर हायवे वर जवळपास दीड ते 2 फूट पाणी साचले असून काही व्यापारी यांच्या दुकानात पाणी घुसले आहे अजून देखील पाऊस जोरदार पडत असल्याने मेढा प्रशासनाने सर्व नागिरकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून शाळा कॉलेज यांना तातडीने सुट्टी जाहीर करून मुलांना घरी सोडण्यात आले आहे पडणारा पाऊस असाच चालू राहिल्यास मेढा बाजारपेठ पाण्याखाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी मेढा परिसरातील नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.