शैक्षणिक प्रवेश प्रकिया,व्यक्तिगत कामांसाठी लागणारे दाखले कागदपत्र मिळवण्यासाठी.महाऑनलाइन सर्व्हरच्या बिघाडामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान.
शैक्षणिक प्रवेश प्रकिया,व्यक्तिगत कामांसाठी लागणारे दाखले कागदपत्र मिळवण्यासाठी.महाऑनलाइन सर्व्हरच्या बिघाडामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान.
----------------------------------
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
----------------------------------
दि.24.मेढा.जावली तालुक्यातील सेतू कार्यालयात सर्व्हर डाउन झाल्यामुळे महाऑनलाईन सेवेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. सर्व्हरचा तांत्रिक दोष असल्याने अनेक विद्यार्थ्यांनीही दाखले न घेताच घरी परतावे लागत आहे.
शैक्षणिक प्रवेश प्रकिया,व्यक्तिगत कामांसाठी लागणारे दाखले कागदपत्र मिळवण्यासाठी जावलीतील तहसिल कार्यालयात सेतू व महा ई-सेवा केंद्रावर सोमवारी प्रचंड गर्दी होती. राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत सेतू व महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून शासकीय अनुज्ञप्ती, जात पडताळणी दाखले प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात.महाऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला असल्याने कामकाज तांत्रिक कारणास्तव ठप्प झाले आहे.ज्यांनी अगोदरच दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे ते दाखलेही स्वाक्षरीविना प्रलंबित आहेत.सर्व्हर डाउन असल्यामुळे अधिकाऱ्यांना लॉगइन करता येत नाही.सध्या महाविद्यालयीन व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू असल्याने दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत तसेच शासनाच्या विविध भरती प्रक्रियांच्या आवश्यकतेच्या पूर्वतयारी म्हणून दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज विद्यार्थी करत असल्याने अर्जाची संख्या वाढली आहे.अशातच राज्य शासनाच्या नव्या योजनांसाठी आवश्यक दाखल्यांसाठी नागरिक गर्दी करत आहेत.
सेतू कार्यालयात सकाळी पासून रांगा लावून उभे असलेले सर्व्हरच्या बिगाडामुळे सायंकाळी हाती निराशा घेऊन विद्यार्थ्यांसह नागरिकांना परत फिरावे लागत आहे.
Comments
Post a Comment