शंभर वर्षों पुर्वीचे वडाच्या झाडाने सोडला प्राण.

 शंभर वर्षों पुर्वीचे वडाच्या झाडाने सोडला प्राण.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधि 

  प्रमोद पंडीत

-----------------------------------------

भणंग तालुका जावली जिल्हा सातारा येथे शंभर वर्षे पुर्वीचे वडाचे झाड मुसाळधार पावसात मुळासह उलथून पडले त्या झाडाने अनेक पिढया पाहिल्या आहेत . 

भणंगचे ग्रामदैवत श्री पाडळेश्वराच्या मंदिराचा जनू काही रक्षक होता . अनेक वर्षे ह्या मंदिराला आपल्या सावलीच्या कुशीत घेतले होते . उबदार सावली देऊन अनेक पिड्यांची माय बनली होती .

नागपंचमी आली कि महिला वर्ग याच वडाच्या झाडावर झोपाळा बांधुन झोके घेत होते . वट पौर्णिमा दिवसी सर्व भणंगच्या सर्व सौभाग्यवंती महिला याच वडाची पुज्या करून आपल्या पतीचे आयुष्य वाढवण्यासाठी नवस करत होते .भंडारा किंवा गोपाळ काला या दिवशी सर्व युवा पिढी पासून तरुणा पर्यंत ते वृद्ध व्यक्ती सुद्धा दहीहांडीचा मनमुराद आनंद लुटत होते ते हि ह्या वडाच्या फांदयाला दहिहांडी बांधून आनंद घेत होते

असे अनेक प्रसंगाचा हा वड साक्षीदार होता

काल मुसाळधार पावसात तरुणांना लाजवेल असा थाटात पावसाचा मार झेलत होता त्याच्या छायेत पाल ढोकून त्याचा कुशित ऊब घेत होते परंतु त्यांच्या केसाला ही धक्का न लावता शेजारीचं जमिनिवर कोसळून आपला शंभर वर्षाचा प्रवासाचा अंत केला .

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.