बोरपाडळे घाटात पुन्हा बर्निंग कारचा थरार.

 बोरपाडळे घाटात पुन्हा बर्निंग कारचा थरार.

------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी

विनोद शिंगे

------------------------------

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे घाटात आज पहाटे पुन्हा बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला या घटनेत प्रसंगावधान राखून मोटर चालक बाहेर पडल्याने अनर्थ टळला

 कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील बोरपाडळे घाटात कार क्रमांक MH 05 AX 4123 जळून खाक झाली. सदरची घटना बुधवार दि. 10 रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली सुमारे तीन वर्षांपूर्वी याच ठिकाणी एक चारचाकी वाहन पेटून एकजण  ठार झाला होता.

     याबाबत घटनास्थळ व राष्ट्रीय  महामार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रत्नागिरीहून निपाणीकडे जाणाऱ्या वसीम हुसेन दावत रा. निपाणी हे बुधवार दि. 10 रोजी बोरपाडळे घाटात कारने आले असता कारच्या लाईट्स अचानक बंद पडल्या. कार बाजूला घेतली असता कारच्या पुढील भागाने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक दावत आपल्या साहित्यासह गाडीतून बाहेर पडले. काही वेळात त्यांच्या डोळ्यादेखत गाडी भस्मसात झाली. सुदैवाने जीवितहानी टळली. पोलिसांना त्यांनी माहिती दिली. यावेळी अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी भेट देऊन वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याला कडेला घेतली. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.