Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप.

 आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप.

---------------------------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

----------------------------------------------------

श्री शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मल्टीपर्पज हॉल मध्ये आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १२५ विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. आमदार पी. एन. पाटील यांच्या दुखःद निधनामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. शाहु जयंतीचे औचित्य साधुन सदर कार्यक्रम करण्यात आला.


आमदार ऋतुराज पाटील आयोजक श्री कुमार आहुजा (बाजार समिती संचालक) व वैभव सावर्डेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच बाजार समितीच्या नुतन उपसभापती सौ सोनाली शरद पाटील यांचा आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात (शां. कृ. पंत वालावलकर हायस्कुल,प्रिन्स शिवाजी विदयामंदिर, ज्ञानगंगा हायस्कुल व ह. भ. प. विवेकानंद वास्कर,आध्यात्मीक व शैक्षणिक गुरूकुल मधिल विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बाजार समिती संचालक कुमार आहुजा, शिवाजीराव पाटील, सुयोग वाडकर, दिलीप पोवार, पांडूरंग काशिद, शेतकरी संघाचे संचालक दत्ताजीराव वारके, बाजार समिती सचिव जयवंत पाटील, भरत रसाळे सर, संजुभाई परीख, मनोहर चुघ, सौ व्हि. एस. कुलकर्णी, डी. बी आळवेकर सर, अशोक आहुजा, विजय कागले, किरण तपकीरे, दिपेन पटेल, अनुप उब्राणी,सचिन सदलगे, किरण आर्दाळकर, संताजी जाधव, कृष्णा भुसारे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सागर आळवेकर यांनी केले तर आभार महेश वारके यांनी मानले.


फोटो ओळ:आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विदयार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप

करण्यात आले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील दादा व मान्यवर

Post a Comment

0 Comments