शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला धरले धारेवर!

 शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला धरले धारेवर!


-------------------------------

कोल्हापूर : प्रतिनिधी

------------------------------

कोल्हापूर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी पूर परिस्थिती ची पाहणी करून प्रशासनाशी चर्चा केली. तसेच चुकीच्या धोरणामुळे प्रशासनाला धारेवर धरले यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, विजय देवणेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिवर्षी पुराचा सामना जनतेला करावा लागतो.या काळात विजेचा लपंडाव, पाणी टंचाई निर्माण होते. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हे ओळखून आज शिवसेनेच्या वतीने पूर भागात पाहणी करून प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी



 थेट पाईप लाईनचे पाणी का थांबले - कधी मिळणार?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याच थेट पाईप लाईन साठी त्यांनी कोट्यावधी निधी दिला , पण कोल्हापूरला अजून दिलासा का नाही ? घोड कुठं पेंड खातय, कि ,,, ! .... कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कोणाकडे मागायची!

 पाणी पुरवठा बंद झाले नंतर , कोल्हापूरातील पुरग्रस्त व जनतेस पाणी पुरवठा कसा होणार व यावर तातडीने उपचार काय ? याचा खुलासा प्रशासनाने द्यावा.

ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले त्यांना तात्काळ राहण्याचे नियोजन व पूर ओसरले नंतर त्यांचे पुनर्वसन व त्यांच्या घरांची नुकसान भरपाई त्वरीत करण्यात  यावे.

 पुरानंतर रस्त्ये , खराब  झालेले आहेत या साठी तातडीने उपाययोजना कराव्यात.

 ज्या शासकीय शाळा किंवा खाजगी शाळांमध्ये पाण्याने नुकसान झाले , त्या शाळांना मदत करा !   पेशंट साठी ॲम्ब्युलन्स व होडी त्वरीत ठेवा आदी प्रश्नांचा शासनावर आज भडीमार करण्यात आला.यावेळी नियाज खान, विशाल देवकुळे,सागर साळोखे,सुशिल भांदिगरे,दत्ताजी दिपुगडे आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

            

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.