काळमवाडी धरणामध्ये बुडालेल्या निपाणी मधील दोन बेपत्ता युवकांचे मृतदेह सापडले.शोध मोहीम. यशस्वी.
काळमवाडी धरणामध्ये बुडालेल्या निपाणी मधील दोन बेपत्ता युवकांचे मृतदेह सापडले.शोध मोहीम. यशस्वी.
--------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे.
--------------------------------
काळामवाडी धरण पाहण्यासाठी आलेल्या निपाणी च्या दोन युवकांचा काळामवाडी धरणामध्ये पाय घसरून बुडाल्याची घटना सोमवारी घडली होती पावसाचे प्रमाण जास्त असल्या मुळे कालव्या मध्ये पाण्याचे पातळी वाढत जाऊ लागल्याने शोध मोहिमेस अडथळे निर्माण होत होते त्यामुळे शोध मोहीम आज मंगळवारी पुन्हा सकाळपासून सुरू करण्यात आली होती आज दुपारी साडे अकराच्या सुमारास दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली आहे.
याबाबत राधानगरी पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की,
निपाणी येथून तेराजण काळामवाडी धरण पाहण्यासाठी सोमवारी सकाळी आले होते
त्यावेळी त्यामधील गणेश चंद्रकांत कदम वर्ष अठरा व गाडीचा ड्रायव्हर प्रतीक पाटील वर्षे 22 हे दोघेजण धरणाच्या कालव्यामध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये गेले असताना त्या दोघांचा पाय घसरल्याने ते कालव्याच्या पाण्यामध्ये पडून बुडाले त्यां दोघांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीम मागवण्यात आली होती
काल काळामवाडी धरण परिसरात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे कालव्यामधील पाण्यात वाढ होत असल्याने रेस्क्यू टीमला दोन युवकांचा शोध घेण्यासाठी अडथळा निर्माण होत होता आज मंगळवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असता रेस्क्यू टीमला प्रतीक पाटील यांचा मृतदेह पहिल्यांदा सापडला त्यानंतर गणेश कदम यांचे मृतदेह दुपारी साडे अकरा वाजता सापडला
तर त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली
Comments
Post a Comment