एन डी आर एफ चे पथक सातारा जिल्हयात दाखल.

 एन डी आर एफ चे पथक सातारा जिल्हयात दाखल.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर 

----------------------------------------

सातारा, दि. २ सातारा जिल्हयात पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड या तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे संभाव्य पूर परिस्थिती, दरड कोसळणे अन्य दुर्घटनांना तात्काळ प्रतिसाद देणे आणि शोध व बचाव कार्य सुनियोजित पार पाडण्यासाठी‌ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात १ जुलै २०२४ रोजी एन डी आर एफ चे पथक दाखल झाले आहे. 

   या पथकासोबत एकुण ३० व्यक्ती असुन २ पोलिस निरिक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. सदयस्थितीत सदरचे पथक कराड येथे तैनात करण्यात आलेले आहे. सदर पथकासमवेत आवश्यक यंत्र सामुग्री व तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे. जिल्हयात कोठेही आपत्ती जनक परिस्थिती उदभवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सदरचे पथक सज्ज ठेवणेत आलेले आहे. 

   पथकातील टिम कमांडर सुजित पासवान तसेच निरीक्षक राजेंद्र कांबळे व पथकातील सदस्यांचे स्वागत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपविभागिय अधिकारी कराड अतुल म्हेत्रे तसेच कराडचे प्रभारी तहसिलदार चंद्रशेखर शितोळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.