ग्रामीण साहित्य संमेलनाचा आदर्श पत्रकार पुरस्कार पांडुरंग पोवार यांना प्रदान.

 ग्रामीण साहित्य संमेलनाचा आदर्श पत्रकार पुरस्कार पांडुरंग पोवार यांना प्रदान. 


------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 कौलव प्रतिनिधी 

संदीप कालिकते

------------------------------

     शिरगाव ता.राधानगरी येथील पत्रकार श्री पांडुरंग दत्तात्रय पोवार यांना ग्रामीण मराठी साहित्य संमेलन २०२४ चा राष्ट्रीय प्रेरणा पत्रकार गौरव पुरस्कार बेडकीहाळ ता.निपाणी येथे, साहित्यिक प्राध्यापक भीमराव धुळबुळू यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला. 

   खासदार कुमारी प्रियंका जारकहोळी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी माजी आमदार शशिकला जोल्ले माजी आमदार काकासाहेब पाटील या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा राष्ट्रीय पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

     श्री पांडुरंग पोवार यांच्या पत्रकारितेची ,सामाजिक कार्याची व कलेची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार २०२४ चा आदर्श पत्रकार म्हणून देण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन पत्रकार विक्रम शिंगाडे पत्रकार अन्वर मुल्ला, अॕड . कोळी मॅडम यांनी केले होते .

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.