Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आमदार आपल्या दारी... योजना पोहोचतील घरोघरी' अभियान.

 आमदार आपल्या दारी... योजना पोहोचतील घरोघरी' अभियान.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधी.

आशिष पाटील

-------------------------------------

तुर्केवाडी, म्हाळेवाडी येथे अभियानाची सुरुवात; महिला भगिनींना उत्स्फूर्त प्रतिसाद.

   चंदगड . महाराष्ट्र शासनाने सुरु पावसाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, बांधकाम कामगार योजना शासनाच्या विविध आदी योजनांची माहिती, त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची माहिती देवून या सगळ्याचे रजिस्ट्रेशन एकाच छताखाली 'आमदार राजेश पाटील यांनी 'आमदार आपल्या दारी... योजना पोहोचतील घरोघरी' या अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. 

चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसात आपल्या महिला भगिनींना कागदपत्रासाठी आणि नोंदणीसाठी पळापळ करावी लागू नये, कुठे पैसे द्यावे लागू नये याकरिता आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वात योजना आपल्या दारी अभियान सुरू करून मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

यावेळी तुर्केवाडीच्या सरपंच संजना ओऊळकर, सर्कल बाळासो सरगर, तलाठी अश्विनी पवार, ग्रामसेवक धनाजी देसाई, उपसरपंच विश्वनाथ ढेकोळकर, जानबा चौगुले, सदस्य कौशल बांदिवडेकर, सुरेखा चौगुले, भक्ती बसापूरे, सावित्री गावडे, अशोक ओऊळकर यांच्यासह महिला भगिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

तसेच म्हाळेवाडी येथे सरपंच सी.ए. पाटील यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जॉन लोबो, गुंडू मेटकूपी, सर्कल नाईक, तलाठी अनिता काटे, ग्रामसेविका कविता जाधव, उपसरपंच विजय मर्णहोळकर, सुरज पाटील, पी.वाय पाटील, प्रमोद पाटील, विनायक पाटील, महेश कांबळे, विलास कांबळे, अनिल कांबळें आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments