पूर ओसरत असलेल्या भागातील स्वच्छतेची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी.

 पूर ओसरत असलेल्या भागातील स्वच्छतेची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी.

---------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------

कोल्हापूर :-  पंचगंगा नदीचे पूराचे पाणी शहरातील ब-याच भागात आले होते. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. शहरातील ज्या भागात पूराचे पाणी आले होते. ते ओसरु लागल्याने महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर कालपासून औषध फवारणी व स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. आज सकाळी या स्वच्छता मोहिमेची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. हि पाहणी जयंती नाला, दसरा चौक सुतारवाडा परिसर, व्हीनस कॉर्नर, गोकुळ हॉटेल स्टेशन रोड, रंकाळा तलाव खराडे कॉलेज येथे केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्‍य निरिक्षक जयवंत पवार उपस्थित होते.


          यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी ज्या ज्या भागात पूराचे पाणी ओसरु लागले आहे त्या ठिकाणी दैनंदिन औषध फवारणी, क्लिनिंग करा. मुंबई, ठाणेवरुन आलेल्या सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनच्या सहाय्याने संपूर्ण ड्रेनेज लाईन स्वच्छ करुन घेण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरिक्षक यांना दिल्या. तसेच सर्व सफाई कर्मचा-यांना हॅन्डग्लोज घालून काम करण्याच्या सूचना दिल्या.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.