वैनगंगा नळगंगा प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात यावा याबाबत लखनसिंह ठाकूर यांनी दिले उपमुख्यमंत्र्यांना निवेदन.
वैनगंगा नळगंगा प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात यावा याबाबत लखनसिंह ठाकूर यांनी दिले उपमुख्यमंत्र्यांना निवेदन.
--------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीतसिह ठाकूर
---------------------------------------
........,....... शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाचा शेतकऱ्याचा जीवनमान उंचावणारा प्रकल्प वैनगंगा नळगंगा या प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत महोदय। समस्त विदर्भाकरिता अत्यंत महत्त्वाचा व शेतकऱ्याचा जीवनमान उंचावणारा वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला दिनांक ७/७/२०२४रोजी आपल्या राज्याचे राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी मंजुरी दिली सदर प्रकल्पामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करण्यात आला , महोदय वाशिम जिल्हा सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत मागासलेला व आकांक्षित जिल्हा म्हणून संपूर्ण विदर्भात प्रख्यात आहे, त्यामध्ये रिसोड तालुका तर सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत मागे असलेला तालुका असून सिंचनाचा कुठलाही मोठा प्रकल्प जिल्ह्यात नव्हे तर तालुक्यात सुद्धा नाही मागील अनेक वर्षापासून रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवर ३बॅरेजेस व्हावे म्हणून मी सारखा पाठपुरावा करतोय परंतु पाणी उपलब्धता प्रमाणपत्र या नावाखाली आजपर्यंत तो प्रकल्प रखडलेला आहेच वैनगंगा नळगंगा प्रकल्प हा खरोखरच शेतकऱ्याचा जीवनमान उंचावणारा शेतकऱ्यांना समृद्ध करणारा प्रकल्प आहे परंतु सदर प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश होईल ही आशा बळावली होती, परंतु सदर प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याला वगळण्यात आल्याच्या प्रसार माध्यमातून बातम्या सारख्या येत असल्याचे निर्दशांनात आणून दिले निवेदनामध्ये आपल्या राज्याचे आधुनिक सिंचनाचे शिल्पकार मा ,ना, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी २५/१२/२०22 च्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्पामध्ये वाशिम जिल्ह्याचा समाविष्ट करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती , परंतु सध्याच्या स्थितीत वैनगंगा नळगंगा या नदीजोड प्रकल्पामध्ये वाशिम जिल्हा वगळण्यात आलेला तरी या शेतकऱ्याच्या जीवनमान उंचावणाऱ्या व नंदनवन करणाऱ्या प्रकल्पा मध्ये आमच्या वाशिम जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात यावा याबाबत आपल्या राज्याचे आधुनिक सिंचनाचे शिल्पकार तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्यांचे खाजगी सचिव श्री विद्याधर महाले साहेब यांच्या द्वारा भाजपाचे उतर भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव लाखनसिंग ठाकूर यांनी निवेदन दिले
Comments
Post a Comment