संभाजी ब्रिगेड उद्योग व्यवसाय अभ्यास दौरा.

 संभाजी ब्रिगेड उद्योग व्यवसाय अभ्यास दौरा.

-------------------------------------------

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत सिंह  ठाकूर

---------------------------------------------

*"सह्याद्री"* हा शब्द जरी कानावर पडला तरी आपसूकच राकट,उंच आणि जिद्दीने उभ्या असलेल्या भव्य डोंगररांगा त्यासोबत असलेला शिवकाळ असे चित्र उभे राहते.

ज्या मातीत हा सह्याद्री आणि इतिहास अनेक नैसर्गिक आणि मानवी संकटांना तोंड देत स्वाभिमानाने उभा आहे त्या मातीतल्या माणसांमध्ये देखील *सह्याद्रीचे गुणसूत्र* अगदी खोलवर रुजलेले आहेत हे अनेक वेळा जाणवते.

म्हणूनच महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही तर इतिहास देखील आहे असे आम्ही नेहमीच अभिमानाने म्हणत असतो.

हे खरे असले तरी फक्त इतिहासात न रमता त्यातून प्रेरणा घेत वर्तमानात देखील काही माणसे जिद्द,साहस आणि दूरदृष्टीने नवा इतिहास घडवत आहेत.भविष्याकाळात इतिहास म्हणून जेव्हा केव्हा लिहिले जाईल किंवा सांगितले जाईल तेव्हा तेव्हा अश्या माणसांची दखल घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही असे काम समर्पण भावनेने करत आहेत.*आपापल्या क्षेत्रातील "शिवाजी"* अश्या सर्वोच्च उपाधीला सार्थ ठरवतील असे *"सह्याद्री"* सम भव्यदिव्य कार्य ही व्यक्तिमत्त्व करत आहेत.

असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला काल संभाजी ब्रिगेड अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला.नासिक जिल्ह्यात *शेती-माती साठी आणि इथल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे* आणि फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतासह जगाला देखील अभिमान वाटावा असे काम संघटितपणे एकत्र येत *सह्याद्री फार्म* च्या माध्यमातून निर्माण करणारे विलास (अण्णा) शिंदे.


*श्री विलास शिंदे* यांचा सर्व प्रवास आणि पुढील भविष्यातील वाटचाल ही भारावून टाकणारी होती.

द्राक्ष निर्यात करणारी भारतातील प्रमुख निर्यातदार म्हणून आज सह्याद्री फार्म चे नाव आदराने घेतले जाते.या माध्यमांतून हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी सह्याद्री कारणीभूत आहे.

टोमॅटो प्रक्रिया उद्योग पाहण्यासारखा आहे.

सध्या येथे हिंदुस्थान लिव्हरचा ब्रँड असलेले किसान टोमॅटो सॉस, जॅम बनवले जात आहे ही देखील उल्लेखनीय बाब आहे.

डाळिंब,केळी यावर देखील शाश्वत काम केले जात आहे.

सह्याद्री फार्मचा परिसर आणि जागतिक दर्जाचे बांधकाम,स्थापत्य हे बघण्यासारखे आहे.

आम्हाला हा परिसर अभ्यासण्याची आणि श्री विलास शिंदे सरांसोबत संवाद साधत त्यांचा प्रवास समजून घेण्याची संधी मिळाली ती *संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेमुळे.*

जात आणि भावना यांचा काला करून समाजाला अधिकाधिक मर्यादित-संभ्रमित करू पाहणाऱ्या शॉर्टकट संकल्पना रूढ होत असताना प्रवाहाच्या विरोधात जाऊन "नवी दिशा नवा विचार" मांडत सामाजिक संघटना म्हणून आपल्या सोबत जोडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला भावनिक आणि मर्यादित करणाऱ्या चौकटीतून बाहेर काढत इतिहासात रमणाऱ्या असंख्य तरुणांना आता आपण जगाला आपली ओळख "बिजनेस कम्युनिटी" म्हणून करून दिली पाहिजे असे ठामपणे सांगत अशी मानसिकता तयार करण्यासाठी सतत कृती कार्यक्रम देणारे *संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यामुळे.*

2 दिवसांचा हा अभ्यास दौरा खरोखर प्रचंड ऊर्जा देणारा होता.पण फक्त भारावून न जाता खऱ्या अर्थाने प्रेरणा घेवून असे काम आणि मेहनत जर आपापल्या क्षेत्रात केली तर फक्त यश नाही यशाच्या शिखरावर आपण पोचल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने मिळाला.

कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करणारे माझे सहकारी आणि नासिक जिल्हाध्यक्ष शिवश्री संतोष गायधनी यांचे देखील विशेष कौतुकच करावे लागेल.

एक प्रगल्भ संवादी आणि अभ्यासू असणाऱ्या शिवश्री प्रविणदादांसारख्या नेतृत्वासोबत मी काम करतोय याचा मला खरोखर अभिमान आ‌हे    अर्जुन पाटील खरात संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वाशिम मो 8412865222

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.