Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गडमुडशिंगीच्या कमानी जवळ झालेल्या अपघातात उचगावचा युवक जागीच ठार.

 गडमुडशिंगीच्या कमानी जवळ झालेल्या अपघातात उचगावचा युवक जागीच ठार.


---------------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

---------------------------------------

गांधीनगर:- मेडिकल मधील औषध आणण्यासाठी जात असताना गाडी स्लीप होऊन झालेल्या अपघातात संजय बाळू पोवार (वय 36,रा शांतीनगर उचगव पूर्व ता करवीर जि. कोल्हापूर) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गडमुडशिंगी ता.करवीर येथे महाराष्ट्र बँकेसमोर सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. 

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी संजय पोवार हे गडमुडशिंगी येथील औषध दुकानांमध्ये एम एच- 09-टीसी 071/4 या दुचाकीवरून औषध आणण्यासाठी दुपारी जात होते. दरम्यान गडमुडशिंगी कमानीजवळ बँ क ऑफ महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर अचानक गाडी स्लीप होऊन ते डोक्यावर पडून बेशुद्ध झाले. घटनास्थळावरील नागरिकांनी शेजारी असणाऱ्या डॉक्टरांना बोलावून तपासले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून मृताचे वडील बाळू शामू पोवार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात अपघाताची वर्दी दिली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार दिगंबर सुतार करत आहेत.

Post a Comment

0 Comments