प्रादेशिक परिवहन कार्यालयात सफाई कामाकरीता दरपत्रके सादर करावीत.

 प्रादेशिक परिवहन कार्यालयात सफाई कामाकरीता दरपत्रके सादर करावीत.

------------------------------------

कोल्हापूर, दि. प्रतिनिधी

------------------------------------

कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात पुढील 11 महिन्यांच्या कालावधीसाठी साफसफाईचे काम करण्यासाठी वार्षिक सेवा करार करण्यासाठी या कार्यालयाच्या सूचनाफलकावर प्रसिध्दिीपत्रक अटी व शर्तींसह प्रसिध्द करण्यात आले आहे. या कार्यालयातील साफसफाईचे कामकाज कंत्राटी पध्दतीने करण्यासाठीचे विहीत नमुन्यातील दरपत्रक दि. 1 ऑगस्ट 2024 पर्यंत मोहोरबंद लिफाफ्यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष जमा करावीत किंवा पाठवावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केले आहे.


प्रादेशिक परिवहन कार्यालय, ताराबाई पार्क, कोल्हापूर कार्यालयाचे एकूण क्षेत्रफळ 19602.0 चौ.मी. इतके असून यापैकी 2276.61 चौ. मी. इतक्या क्षेत्रावर कार्यालयीन इमारत असून उर्वरीत जागा मोटार वाहन अनुज्ञप्ती, लायसन टेस्ट, वाहने अटकावून ठेवण्याची जागा, नवीन वाहने तपासणी करणे इ. कामकाजासाठी उपयोगात आणली जात आहे. मुदतीनंतर प्राप्त दरपत्रकाचा विचार केला जाणार नाही. तसेच दरपत्रके मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे राहतील. अधिक माहितीसाठी 0231-2663131 वर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.