ऊस, भात पिके कुजण्याची भिती, दूध संकलन ही बंद.. शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका.
ऊस, भात पिके कुजण्याची भिती, दूध संकलन ही बंद.. शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका.
-----------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------
बाजारभोगावं (ता. पन्हाळा )गेले दहाबारा दिवसापासून जांभळी व कासारी खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कासारी नदीस पुर आला आहे. हे पाणी पात्राबाहेर आल्याने नदीकाठावरील पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील शुक्रवारी कासारी व जांभळी नदीचे पाणी पात्राबाहेर खोऱ्याचे आले आहे तसेच जांभळी प्रवेशद्वार असणाऱ्या भिवराज मंदिराच्या शेजारी असणाऱ्या पडसाळी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने जांभळी खोऱ्याला बेटाचे स्वरूप निर्माण झाले आहे.परिणामी येथील दूध संकलन बंद असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुराचे पाणी वाढत असून हे पाणी लवकर उतरण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे पाण्याखाली बुडलेले शेकडो एकरमधील ऊस व भात पिक कुजण्याची भिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पडल्याने सर्वच नद्यांना पूर आला आहे असा पूर आणखी काही दिवस राहिल्यास नदीकाठावरील पिके कुजणार. हे सर्व टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
बळीराम पाटील
शाखाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना बाजारभोगाव
कासारी नदीकाठावरील शिवारात पुराचे पाणी आले असून या पुराच्या पाण्याखाली ऊस पीक असून फक्त ऊसाच्या पानाचे शेंडे दिसत आहे.
Comments
Post a Comment