जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती जावली (मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ गावामध्ये राबवण्यात आले " महास्वच्छता अभियान.

जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती जावली (मेढा) यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ गावामध्ये राबवण्यात आले " महास्वच्छता अभियान.

-------------------------------------

जावली प्रतिनिधी

शेखर जाधव 

-------------------------------------

 दिनांक २७ जुलै २०२४ रोजी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन. जिल्हा परिषद सातारा ,पंचायत समिती जावली (मेढा) व ग्रामपंचायत कुडाळ , जि.प. प्राथमिक शाळा व अंगणवाडी कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ यांचे संयुक्त विद्यमानाने कुडाळ गावामध्ये पावसाळ्यातील जलजन्य व साथरोग आजार टाळणेसाठी "महास्वच्छता अभियान" राबवणेत आले.

सातारा जिल्ह्यात सद्य स्थितीमध्ये पावसाळा सुरु असल्याने गावागावांमध्ये जलजन्य व साथरोगांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू या आजाराने बाधित लोकांची संख्या जास्त आहे. यासाठी आपल्या जावली विकास गटातील सर्व गावांमध्ये दिनांक २७/०७/२०२४ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत महास्वच्छता अभियान" राबविणेतच्या तसेच, यामध्ये ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला, बचत गट प्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, युवक यांचा सहभाग घेण्यात यावा. महा स्वच्छता अभियानामध्ये पुढील प्रमाणे उपक्रम हाती घेण्यात आले.


१) गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय ठिकाणांची स्वच्छता करणेत आली.


२) पाणी पुरवठा स्तोत्रांची स्वच्छता करणे व दुरुस्ती करणेत आली.


३) गावातील तुंबलेली गटारे वाहती करणे, कुठेही डबके साचू दिले नसलेचे खातरजमा करण्यात आली .


४) गावातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाणी स्तोत्रांची स्वच्छता करणेत आली.


५) कुटुंब व व्यवसायीकांकडे असणारे अनावश्यक साहित्य यामध्ये टायर, तुटक्या वस्तू इ. यांची विल्हेवाट लावणेत आली.


६) गावांमध्ये कोठेही डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करणेत आली.


७) आवश्यकतेनुसार सार्वजनिक ठिकाणी तणनाशकाची फवारणी करणेत आली.


८) नियमित स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे .


९) जलजन्य व साथरोग आजार व औषधोपचाराबाबत गृहभेटी देऊन जनजागृती करणेत आली .


महास्वच्छता अभियान उपक्रमासाठी झाडू, कचराकुंड्या, थैल्या, हातमोजे, मास्क, सॅनिटायझर, फावडे, घमेली इ. साहित्य व घंटागाडी उपलब्ध करणेत आली होती तसेच गोळा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थितरीत्या विल्हेवाट लावणेत आली. गोळा झालेला कचरा इतरत्र पडणार/विस्कटला जाणार नाही याची दक्षता घेणेत आली तसे निदर्शनास आलेस संबंधीत यांना जबाबदार धरणेत येईल याची दंवडी देणेत आली होती. तसेच तालुका व गावस्तरावर गुडमॉर्निंग पथके नेमून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती ग्रामस्थांना देणेत आली होती.


सिंगल युज प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्या व्यक्तीवर व सर्व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करणेत येईल कल्पना संबधिताना देणेत आली. तसेच दिनांक २७/०७/२०२४ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत महास्वच्छता अभियान राबविणेसाठी कुडाळ गावांत अगोदरच गावपातळीवर व्हॅट्स अँप ग्रुप स्थानिक वृत्तपत्रे व चॅनेल, दवंडी व नोटीस देऊन गावामध्ये सर्व दर्शनी भागात फेल्क्स लावून महा स्वच्छता अभियानाची प्रसिद्धी व जनजागृती करण्यात आली होती. महा स्वच्छता अभियानात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग नोंदविला गेला कारण याप्रमाणे नियोजन करणेत आले होते.

याप्रसंगी श्रीमती.याशनी नागराजन (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा ,श्रीमती.क्रांती बोराटे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता मिशन) ,जिल्हा परिषद सातारा , श्री. मनोज भोसले गट विकास अधिकारी वर्ग १ पंचायत समिती जावली ( मेढा) ,श्री.संजय धुमाळ गटशिक्षणाधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती जावली ,डॉ. मोहिते तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य विभागा पंचायत समिती जावली (मेढा) तसेच ग्रामपंचायत कुडाळचे सरपंच माजी सरपंच सदस्य सन्माननीय नागरीक पत्रकार आशा सुपरवायझर अंगणवाडी ताई सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीचे पचायत विभागाचे विस्तार अधिकारी ग्रामसेवक मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी शासकीय कर्मचारी स्वच्छता विषयक कर्मचारी हे याप्रसंगी ग्रामपंचायत कुडाळ प्राथमिक शाळा कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ या ठिकाणी उपस्थित होते सदर अभियान सकाळी आठ वाजता सुरू करून ते दुपारी १२:३० वाजता संपन्न करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.