आशियाई कुस्ती स्पर्धेत पट्टणकोडोली गावाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा- माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर.

 आशियाई कुस्ती स्पर्धेत पट्टणकोडोली गावाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा- माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर.

------------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------------

थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत पट्टणकोडोली ता. हातकणंगले येथील कु. रोहिणी खानदेव देवबा हिने गोल्ड मेडल तर कु.यश काशिनाथ कामांन्ना याने सिल्वर मेडल  मिळवून भारतासह आपल्या तालुक्याचे नाव केल्याबद्दल त्या दोघांचा सत्कार मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी केला. तसेच यापुढेही कुस्ती क्षेत्रात अशीच कामगिरी करत जास्तीत जास्त मेडल मिळवून आपल्या प. कोडोली गावचा दबदबा कायम ठेवावा अशा शुभेच्छाही यावेळी दिल्या.

       यावेळी शिवसेना शहर प्रमुख आण्णा जाधव, लक्ष्मण पुजारी, किसन तिरपणकर, पोपट कांबळे, मारुती रांगोळे, पिंटू माळी,शिवा डावरे, रामा कुशाप्पा, सूकुमार बोरगाव, सोमनाथ कामांन्ना तसेच कामांन्ना कुटुंबीय,देवबा कुटुंबीय व तालमीतील पैलवान उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.