Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शाहुवाडी तालुक्यात भयंकर घटना मुलांच्या निधनाला तीन दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आईने सोडले आपले प्राण.

 शाहुवाडी तालुक्यात  भयंकर घटना मुलांच्या निधनाला तीन दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आईने सोडले आपले प्राण.

------------------------------------------

शाहुवाडी तालुका प्रतिनीधी 

आनंदा तेलवणकर

------------------------------------------

शाहुवाडी :बुधवार  3 जुलै रोजी कोपार्डे गावातील  सुहास आणि स्वप्निल' या तरुण भावंडांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता तरुण तरण्याबाड मुलांचा अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या आईला मानसीक धक्का बसला हा मानसिक धक्का सहन न झाल्याने आई नंदाताई कृष्णा पाटील (वय ५६) यांचा शनिवार, दि.०६ जुलै २०२४ रोजी, मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले.

पाटील कुटुंब संसाराचा रहाटगाडा गुण्यागोविंदाने हाकत होते.मात्र नियतीने वेगळा डाव साधून

सुहास-स्वप्निल' यांच्या निधनानंतर

आई नंदाताई कृष्णा पाटील यांच्या निधनाची बातमी खूपच वेदनादायक आहे.


असा प्रसंग ओढवल्यामुळे पाटील कुटुंबावर फार मोठ्ठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments