"बच्चे सावर्डे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त पायी पालखी व दिंडी सोहळा तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ"

 "बच्चे सावर्डे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त पायी पालखी व दिंडी सोहळा तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ"

------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

 विजय बकरे

------------------------------

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे येथून श्री .ज्योतिर्लिंग, नागोबा, 32 शिराळा देवस्थानचा निरोप घेऊन असंख्य भाविक भक्त पंचगंगा ,वारणा,मोरणा ,कृष्णा तीरावरून आषाढी वारीचे औचित्य साधून मोठ्या भक्ती भावाने सावर्डे येथील श्री. दत्त मंदिरातून जय हनुमान व दत्त माऊली या नावाने श्री .क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेच्या व भीमेच्या तिरी श्री .विठ्ठल -रुक्मिणी यांचे दर्शनासाठी असंख्य भाविक भक्त वारकरी वेषामध्ये पालखी व दिंडीच्या स्वरूपात भगव्या पता- की खांद्यावरती घेऊन "ज्ञानोबा माऊली" च्या जयघोषणात पायी दिंडीने पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. या सर्व भाविक भक्तांना प्रोत्साहन देण्यासाठी बच्चे सावर्डे व आसपासच्या अनेक भागातील भाविक भक्त दिंडी मार्गस्थ होताना उपस्थित होते .व सर्वांनी सर्व पंढरीच्या तीर्थक्षेत्री पायी दिंडीच्या रूपाने जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनींना शुभेच्छा व्यक्त केल्या .सदरची पायी दिंडी मोठ्या उत्साहाने लादेवाडी, कामेरी ,देवराष्ट्रे ( सागरेश्वर), भाळवणी (विटा), रेवणसिद्ध, खरसुंडी ,आटपाडी, लोटेवाडी, महूद, सोनके ,कोर्टी मार्गे पंढरपूर या तिर्थक्षेत्री श्री .विठ्ठल- -रुक्मिणी च्या भेटीसाठी अतिशय उत्साहाने सुरू असून या दिंडीमधील धार्मिक कार्यक्रमामुळे या दिंडीचे सर्व मुक्कामाच्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ अतिशय मनोभावे आगत -स्वागत करीत असून सर्वांना धन्यवाद देत आहेत या दिंडीचे हे नववे वर्ष असून बच्चे सावर्डे व भागातील भाविक भक्तांच्या या कार्याला सर्व ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.