केडीसीसी बँकेची कर्मचाऱ्यांना पगारवाढ ! संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय.

 केडीसीसी बँकेची कर्मचाऱ्यांना पगारवाढ ! संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय.

-----------------------------------

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-----------------------------------

   केडीसीसी बँकेची कर्मचाऱ्यांना पगारवाढ संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय  पाच ऑगस्टला युनियन व बँक व्यवस्थापनात होणार करार

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना चार टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील निर्णय बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बँकेत कार्यरत असलेल्या कोडीको बँक एम्प्लॉईज युनियन, बँक एम्प्लॉईज युनियन या दोन्हीही युनियन व बँक व्यवस्थापनामध्ये याबाबत पाच ऑगस्टला करार केला जाणार आहे. एक एप्रिल २०१७ पासूनचा ३६ कोटी फरकही कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.

जिल्हा बँक कर्मचारी व बँक व्यवस्थापनामध्ये २००७ मध्ये पगारवाढीचा करार झाला होता. त्याची मुदत मार्च २०११ पर्यंत होती. मात्र, बँकेवर २००९ ला प्रशासकीय मंडळ आल्याने पुन्हा करारच होऊ शकला नाही. मे - २०१५ मध्ये बँकेचे संचालक मंडळ कार्यरत झाले. मात्र, बँकेला संचित तोटा असल्याने पगारवाढीचा निर्णय झाला नाही. बँक २०१७ ला नफ्यात आल्यानंतर युनियनने पगारवाढीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यातून २००४ व २०१८ मध्ये कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक-एक इन्क्रिमेंट, पाच टक्के पगारवाढ व मागील फरक आदी मागण्या युनियनने केल्या होत्या. गेल्या वर्षभरात बँक व्यवस्थापन व युनियनमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. यातून चार टक्के पगारवाढ, सात वर्षांचा फरक आदी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. फरकापोटी बँकेने मार्च २०२४ च्या ताळेबंदाला १५ कोटींची तरतूद करून ठेवली आहे. परंतु; एकरक्कमी पगार फरक देण्याची मागणी युनियनची आहे.वर्षाला ३७ कोटींचा अतिरिक्त बोजा.....!

पगारवाढीच्या निर्णयाने जिल्हा बँकेला वार्षिक ३७ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मुळात बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे ताळेबंदावर फारसा ताण पडेल, अशी सध्या तरी स्थिती नाही.

       एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१७ अखेर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी कोणत्याही पगारवाढ मिळाली नाही. त्यांच्यासाठी युनियनने महिन्याला २०० रुपयांची मागणी केली होती, संचालक मंडळाने १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ७१ महिन्यांचे प्रत्येक ७१०० रुपये मिळणार आहेत.असे झालेत निर्णय.

        एक एप्रिल २०१७ पासून चार टक्के पगारवाढ.सात वर्षांचा ३६ कोटी फरकही मिळणार.सेवानिवृत्तांना ७१ महिन्यांचे ७१०० रुपये मिळणार.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आ राजूबाबा आवळे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आ अमल महाडिक, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, राजेश पाटील, सौ. श्रुतिका काटकर,  स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी आय. बी. मुन्शी, दिलीप लोखंडे आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे, अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.