Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी तज्ञ शिक्षकांना सलाम मुंबई फॉउंडेशन कडून प्रशिक्षण.

 तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी तज्ञ शिक्षकांना सलाम मुंबई फॉउंडेशन कडून प्रशिक्षण.

 -----------------------------------

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर 

-----------------------------------

रिसोड /प्रतिनिधी:- वाशीम जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी सलाम मुंबई फॉउंडेशन च्या वतीने सारिका कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम येथील सुंदर वाटिका स्थित श्री समर्थ स्कुल मध्ये दि.8 जुलै सोमवारी वाशीम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच तज्ञ् शिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

 झाले.प्रशिक्षणाला शिक्षणाधिकारी शिंदे, सलाम मुंबई फॉउंडेशन च्या सारिका कदम,गडॉ. सरकटे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे गायकवाड, अनिल काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिक्षणाधिकारी काळे यांनी मार्गदर्शन करताना तंबाखूमुक्त शाळा करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.भावी पिढीला या विळख्यातून वाचवायचे असेल तर के काम सर्वांनी आपले कर्तव्य समजून अग्रक्रमाने करण्याचे सूचित केले. डॉ. सरकटे यांनी तंबाखूजन्य पदार्थामुळे देशातील तरुणाई मानसिक व शारीरिक हानी करुन घेत आहे. काळानुसार व्यसनाच्या पद्धती बदलत गेल्या मात्र तंबाखूच्या सेवणाचे होणारे दुष्परिणाम वाढत गेले हे थांबविण्यासाठी प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त होणे गरजेचे आहे. फॉउंडेशन च्या सारिका कदम यांनी शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी कोणत्या नऊ निकष्यावर काम करुन शाळा तंबाखूमुक्त करावी याविषयीं सविस्तर मार्गदर्शन केले.प्रत्येक तालुक्यातील पाच तज्ञ् शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांना तालुकास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.रिसोड तालुक्यातील साहेबराव जाधव मुख्याध्यापक संत तुकाराम विद्यालय कंकरवाडी, रवि अंभोरे शिक्षक स्वामी विवेकानंद विद्यालय व्याड, कैलास अंभोरे शिक्षक भारत माध्यमिक शाळा चिंचाबाभर,

 श्रीराम फुपाटे शिक्षक स्व. किसनराव सदार विद्यालय खडकी, केंदप्रमुख घनाश्याम पत्रे इत्यादी शिक्षकानी तज्ञ शिक्षक म्हणून प्रशिक्षण पुर्ण केले.तालुक्यातील सर्व शाळेतील शिक्षकांचे लवकरच तंबाखूमुक्त शाळा प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तालुका स्तरावरील प्रशिक्षणाला सलाम मुंबई फॉउंडेशन च्या सारिका कदम उपस्थित राहून मागदर्शन करणार आहेत.

Post a Comment

0 Comments