भेंडवडे गावातील नागरिकांचे पूर परिस्थितीमुळे स्थलांतर.

 भेंडवडे गावातील नागरिकांचे पूर परिस्थितीमुळे स्थलांतर.

----------------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

----------------------------------------

भेंडवडे तालुका हातकणंगले येथील नांगरे गल्ली पाटील गल्ली हूजरे मळा कोळी मळा चव्हाण व निकम मळा परिसरातील नागरिकांना वारणा नदीला आलेल्या पुरामुळे स्थलांतरित करण्यात आले असून, भेंडवडे येथील शासकीय रुग्णालयात वारणा नदीचे पाणी घुसल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी भेंडवडे ग्रामपंचायतीला वारना नदीच्या  पुराच्या पाण्याने विळखा घातला असून लवकरच पावसाचे प्रमाण न थांबल्यास वारणा नदीच्या पाण्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन, भेंडवडे गावात पुराचे पाणी घुसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2019 नंतर पुन्हा एकदा भेंडवडे गावला महापुराचा धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांच्यातून बोलले जात असून सदर नदी पात्राच्या शेजारी असणाऱ्या सर्वच लोकवस्ती ग्रामपंचायत व प्रशासनाने हलवली असून सदर परिसरातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे .

        परिणामी हळूहळू अनेक लोकांनी आपली स्थलांतर सरकारी शाळा परिसरात करण्यास सुरुवात केली असून ग्रामपंचायत प्रशासन पुरावरर्ती नियंत्रण ठेवून असल्याचे दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.